राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – वार शुक्रवार, दि. 04.02.2022

शुभाशुभ विचार- 16 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – श्री गणेश जयंती, विनायक चतुर्थी.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा 15.58 पर्यंत नंतर उत्तराभाद्रपदा
चंद्र राशी – कुंभ 10.03 पर्यंत नंतर मीन.
—————————————-

आजचे राशीभविष्य

मेष -( शुभ रंग -राखाडी)

आज स्वार्था कडे लक्ष असू द्या. दानधर्म करताना स्वतःची शिल्लक तपासा. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळले तर बरे होईल. असलेले पैसे जपून वापरा.

वृषभ- ( शुभ रंग – मरून )

आत्मविश्वासाने नवे उपक्रम राबवू शकाल. पैशाअभावी रखडलेली कामे सुरू करता येतील. लघु उद्योजकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. काही येणी वसूल होतील .

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य राहिल.

कर्क (शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घ्यायची तयारी ठेवा. उपासनेत खंड पडू देऊ नका.

 

सिंह (शुभ रंग -चंदेरी)

आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. जरा डोके शांत ठेवण्याची गरज आहे. वाहन चालवताना डोक्यात विचारांची गर्दी नको.

कन्या- ( शुभ रंग- पांढरा)

आज नोकरीच्या ठिकाणी हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करून लवकर घर गाठाल. थोडी चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. वैवाहिक जीवनात आज दोघात तिसरा येऊ देऊ नका.

 

तुळ – (शुभ रंग – नारिंगी)

व्यवसायात ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तुमची तयारी असेल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश निश्चित मिळणार आहे. आज तब्येतीच्या बाबतीत निष्काळजीपणा नको.

वृश्चिक -(शुभ रंग – सोनेरी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. तुमची काही गुपिते उघड होतील. आज कामापुरतेच बोलणे हिताचे राहील.

 

धनु- (शुभ रंग- निळा )

आज अथक परिश्रमांच्या साह्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. काही योग्य माणसे आज संपर्कात येतील. यश हाकेच्या अंतरावर आल्याचे जाणवेल.

मकर -(शुभ रंग -आकाशी)

नकळत झालेल्या चुकीमुळे काही आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील. विनाकारण शेजाऱ्यांच्या भानगडीत लक्ष घालू नका.

 

कुंभ – ( शुभ रंग -जांभळा)

अत्यंत आनंदी उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस असून. परिवारात सामंजस्य राहील. मुले आज्ञेत राहतील.

मीन ( शुभ रंग- क्रीम)

आज रुग्णांनी पथ्य पाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे. महत्त्वाकांक्षांना थोडा ब्रेक लावून विश्रांतीस प्राधान्य द्या.

 

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन- ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: