राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – शुक्रवार, दि. 26.11.2021

शुभाशुभ विचार – 17 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – अश्लेषा 20.26 पर्यंत नंतर मघा नक्षत्र.
चंद्र राशी – कर्क 20.26 पर्यंत नंतर सिंह.
—————————————

आजचे राशीभविष्य –

मेष – ( शुभ रंग- मरून)

तुमचे मनोबल उत्तम असेल, आवक पुरेशी असेल. वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल.परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढतच राहणार आहेत.

वृषभ ( शुभ रंग -राखाडी)

नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. अति व्यस्ततेमुळे आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. तुमची काही गुपिते उघड होण्याची शक्यता आहे, कमीच बोला.

मिथुन-( शुभ रंग- आकाशी)

आज पैशाची कमतरता जाणवणार नाही. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाचा मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.

कर्क-( शुभ रंग- निळा)

हट्टीपणा सोडून आज संयमाने वागण्याची गरज आहे. जोडीदारास दिलेले शब्द पाळावे लागतील. काही मनाजोगत्या घटना उत्साह वाढवतील. तब्येतीच्या तक्रारी कमी होतील.

सिंह- ( शुभ रंग- चंदेरी)

आवक-जावक समान राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील. खर्च मात्र आज टाळता येणार नाही. अति आत्मविश्‍वास मात्र घातक ठरेल. इतरांस मदत करताना आपली ही शिल्लक तपासा.

कन्या- ( शुभ रंग -पांढरा)

प्रतिष्ठितांच्या ओळखीतून काही तरी फायदा होईल. दिवस लाभाचा असून अनेक अवघड कामे आज सोपी होतील. काही भाग्यवान नव्या घराचा ताबा घेतील. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील.

तूळ -(शुभ रंग- सोनेरी)

व्यवसायातील प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी कामाचे तासही वाढवावे लागतील. गृहिणींना क्षणभरही उसंत मिळणं कठीण आहे.

वृश्चिक-( शुभरंग – स्ट्रॉबेरी)

आज केवळ स्वप्नरंजनापेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. दैव तुमच्याच बाजूने असल्याने प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. कुणाला मोफत सल्ले देऊ नका.

धनु (शुभ रंग -भगवा)

आज कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. वैवाहिक जीवनातील किरकोळ वाद फार ताणू नका. जोडीदारास फार प्रश्न न विचारणे हिताचे राहील. सासुरवाडी कडून काही लाभ संभवतो.

मकर – ( शुभ रंग -जांभळा)

व्यवसायात भागीदारांशी सलोखा राहील. आज इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणेच हिताचे राहील. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. प्रवासात खोळंबा होईल.

कुंभ- ( शुभ रंग -गुलाबी)

नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्‍नात लक्ष घालावे लागणार आहे. उच्चशिक्षितांना मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील.

मीन -(शुभ रंग- मोतीया)

तुमच्या कामातील उत्साह आज इतरांना प्रेरणा देईल. हौशी मंडळींना आज जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. गृहिणींना आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावेच लागणार आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: