राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 13 February 2023
वार – सोमवार.
13.02.2023
शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस.
आज विशेष- कालाष्टमी
राहू काळ – सकाळी 07.30 ते 09.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – विशाखा.
चंद्र राशी – तुळ 20.37 पर्यंत नंतर वृश्चिक.
—————————————-


मेष (शुभ रंग – तांबडा)
कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू होऊ शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

वृषभ (शुभ रंग – हिरवा)
किरकोळ वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना मात्र आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.

मिथुन (शुभ रंग – गुलाबी)
कला क्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च करू शकाल.

कर्क (शुभ रंग – डाळिंबी)
आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणे गरजेचे वाटेल. आज वास्तु व वाहन खरेदीच्या मार्गातील अडचणी दूर होणार आहेत. आज आशादायी दिवस.

सिंह (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावरच घेतील. काहीजण सहकुटुंब प्रवासास निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळून येतील. वाणित मात्र मृदुता असायला हवी.

कन्या (शुभ रंग – पांढरा) – Today’s Horoscope 13 February 2023
आर्थिक आवक मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. वाणीत गोडवा ठेवला तर अनेक अवघड कामे सोपी होणार आहेत. प्रवासात मात्र त्रास होईल.

तूळ (शुभ रंग – भगवा)
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल आहे. सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. उपावरांना आज योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक आज नमते घेतील.

वृश्चिक (शुभ रंग – पिस्ता)
कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल. पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षितपणे प्रवास घडणार आहेत. गोडबोल्या मंडळींपासून लांब राहा. मोहात फसू नका.

धनु (शुभ रंग – सोनेरी)
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवू शकता.

मकर (शुभ रंग – लाल)
उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज कर्तव्यातच प्राधान्य देणे गरजेचे आहे. अतिव्यस्त दिवस.

कुंभ (शुभ रंग – मोतिया)
आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात किरकोळ अडचणींचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल.

मीन (शुभ रंग – आकाशी)
आज कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे टाळाच. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. स्वतःवर संयम असू द्या. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा.
उपासनेत खंड नको.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: