राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 February 2023
वार – शनिवार.
18.02.2023
शुभाशुभ विचार – प्रतिकूल दिवस.
आज विशेष- महाशिवरात्री, शनि प्रदोष.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- उत्तराशाढा 17.42 पर्यंत नंतर श्रवण.
चंद्र राशी – मकर.
—————————————-


मेष (शुभ रंग- निळा)
आज तुम्ही आळस झटकून कामाला लागल. पण अति उत्साहात आज काही चुकीचे निर्णय घ्याल. हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कुणालाही शब्द देऊ नका.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधणे गरजेचे आहे.

मिथुन (शुभ रंग- गुलाबी)
कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या चुका काढण्यासाठी विरोधक टपूनच बसलेले आहेत. वरिष्ठांचे काही केले तरी समाधान होणार नाही. आज संध्याकाळी सत्संगाकडे पावले आपोआपच वळतील.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
केवळ मोठेपणासाठी आज न झोपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. आज जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला थोडी विश्रांतीची ही गरज आहे.

सिंह (शुभ रंग- सोनेरी)
आज काही आरोग्याच्या तक्रारीने तुम्ही त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. शब्द मात्र जपून वापरा.

कन्या (शुभ रंग- पांढरा)
दुकानदारांची उधारी वसूल होईल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील.

तूळ (शुभ रंग- भगवा)
हौशी मंडळी आज जीवाची मुंबई करण्यासाठी पैसा खर्च करतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

वृश्चिक (शुभ रंग- मरून) – Today’s Horoscope 18 February 2023
वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.

धनु (शुभ रंग- मोतिया)
आज तुम्ही गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल. एखाद्या कामासाठी आज तुम्हाला शेजाऱ्यांची ही मदत घ्यावी लागेल. दुरावलेली काही नाती आज जवळ येतील.

मकर ( शुभ रंग- मोरपिशी )
आज तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे वागाल तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होऊ शकते कठोर बोलण्याने नाती दुरावण्याची शक्यता आहे कुणाला आज मोफत सल्लावाटप करू नका.

कुंभ (शुभ रंग – लाल)
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधल्यास नक्की सापडेल.

मीन (शुभ रंग – आकाशी)
कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी ही कराल. लांबच्या प्रवासात अजिबात बेसावध राहू नका.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: