राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – जाणून घ्या आजचे राशिभविष्य – वार – शुक्रवार. 04.08.2023 . शुभाशुभ विचार- 13 नंतर चांगला दिवस. आज विशेष- संकष्ट चतुर्थी ( चंद्रोदय 21.27), राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00 . दिशा शूल – पश्चिमेस असेल. आजचे नक्षत्र – शततारका 07.08  पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा. चंद्र राशी – कुंभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- मरून )

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अप्रिया स्वप्नांची पूर्तता होण्याची शक्यता आहे. जसे चिंताल तसेच होईल. त्यामुळे आज फक्त शुभच चिंता.

वृषभ (शुभ रंग- जांभळा )

आज तुम्ही रिकामटेकड्या चर्चा टाळून फक्त कर्तव्यासच प्राधान्य देणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गास वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. मित्र आज चुकीचे सल्ले देतील.

मिथुन ( शुभ रंग- क्रीम )

ज्येष्ठ मंडळींना संततीकडून शुभ समाचार येतील. आज तुमचा अध्यात्माकडे कल राहील. घरात एखादे देव कार्य करण्याचे बेत अखाल. घरातील मोठ्यांचा मान राखावा लागेल.

कर्क (शुभ रंग- राखाडी)

आज आपल्या कुवती बाहेर कोणतीच रिस्क घेऊ नका. हातचे सोडून पडत्या मागे धावायचा मोह टाळायला हवा. आज सासुरवाडीकडून लाभ संभवतो पत्नीच्या हो ला हो करा.

सिंह (शुभ रंग- लाल )

व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील आज वैवाहिक जीवनातही सामंजस्याची भावना असेल. आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुमचा आज प्रयत्न असेल.

कन्या ( शुभ रंग- मोतिया)

नोकरदारांना कामाचे तास वाढवावे लागतील. कोणतीही गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज यश नक्की मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ ( शुभ रंग- निळा)

नोकरदारांना आज त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज तुमचा हौस मौज करण्याचा मूड असेल सहकुटुंब चैन कराल. प्रेम प्रकरणांना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील.

वृश्चिक (शुभ रंग- मोरपंखी)

आज तुम्ही प्रत्यक्ष कृतीपेक्षा चर्चेतच जास्त रमाल. कुठेही न जाता आज घरीच आराम करण्याचा तुमचा मूड असेल. गृहिणीचे गृह उद्योग आज तेजीत चालतील

धनु- (शुभ रंग- पांढरा)

आज घराबाहेर वावरताना डोके थंड व वाणित गोडवा असू द्या. आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील मोफत सल्लागार मंडळीच्या होला हो करा व वादविवाद टाळा

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

व्यापार उद्योगात मिळकत मनाजोगती असेल. बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरू करता येऊ शकतील. आप्तेस्वकीय तुमच्या शब्दास मान देतील. गोड बोलून विरोधकांची ही मने जिंकाल.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी)

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. तुमच्याकडून काही आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुणालाही मागितल्याशिवाय सल्ले देऊ नका.

मीन -(शुभ रंग – आकाशी )

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे काही जणांना तातडीच्या प्रवासास निघावे लागेल. केवळ भिडस्तपणापाई न परवडणारा खर्च करू नका.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क *9689165424*

ग्लोबल न्युज नेटवर्क: