राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 22 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

22.07.2023.

शुभाशुभ विचार- 09 नंतर चांगला.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 9.00  ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वाफाल्गुनी 16.58 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह 23.42 पर्यंत नंतर कन्या.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- डाळिंबी )

कला क्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. आज स्वतःचे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही तुम्ही खर्च कराल.

वृषभ (शुभ रंग- मोतिया )

आज तुम्हाला काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. स्थावरच्या खरेदी विक्रीत नफा होईल. आज मुले आज्ञेत राहतील आणि पालकांच्या अपेक्षा पूर्ण करतील.

मिथुन ( शुभ रंग- सोनेरी )

आज काहीजण सहकुटुंब प्रवासाला निघतील. प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. गृहिणी घर स्वच्छतेचे आज मनावरच घेतील. वाणीत मात्र आज गोडवा असणे गरजेचे आहे.

कर्क (शुभ रंग- गुलाबी.)

आर्थिक आवक मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणित मृदुता ठेवलीत तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात मात्र आज त्रास होईल.

सिंह (शुभ रंग- पांढरा )

आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल आहे. सर्व कामे विना व्यत्यय पार पडतील. उपावरांना आज मनापसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक नमते  घेतील.

कन्या ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना आज थोडीफार तारेवरची कसरत होईल. पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षित पणे आज दूरचे प्रवास घडणार आहेत.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता )

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

वृश्चिक (शुभ रंग- आकाशी)

उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची संधी मिळेल. नोकरीत बाढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे अतिव्यस्त दिवस.

धनु- (शुभ रंग- निळा)

आज सज्जनांच्या सहवासात चांगली वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )

कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे आज टाळाच. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूरच रहा. झटपट लाभाचा मोह टाळा. संयम बाळगा.

कुंभ (शुभ रंग – क्रीम)

कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

मीन -(शुभ रंग – मरून)

किरकोळ वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळणार आहे.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क -9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: