राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope  21 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शुक्रवार.

21.07.2023.

शुभाशुभ विचार- १२ नंतर चांगला.

आज विशेष- विनायक चतुर्थी.

राहू काळ – सकाळी 10.30  ते 12.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – मघा 13.58 पर्यंत नंतर पूर्वा.

चंद्र राशी – सिंह.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

उच्च शिक्षित विद्यार्थ्यांच्या महत्त्वकांक्षा वाढतील. नोकरदारांना नोकरीत बदल करायचा असल्यास उत्तम संधी चालून येतील. खेळाडू आज उत्तम कामगिरी करतील.

वृषभ (शुभ रंग- चंदेरी )

घरगुती लघु उद्योग तेजित चालतील. वाहनाच्या खरेदी विक्रीत चांगला फायदा होईल. प्रेमप्रकराणे डोक्याला मनस्ताप देतील. मुलांनी पालकांच्या आज्ञा पाळाव्यात.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )

आज एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बरीच धावपळ होईल व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने आज काही महत्त्वाच्या ओळखी होतील आज शेजारी आपलेपणानेच डोकावतील.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रातील तुमचे कष्ट करणी लागतील. उद्योजकांची आवक वाढेल. नेतेमंडळींच्या नेतृत्वाचा जन्म माणसांवर प्रभाव राहील स्पष्ट वक्तेपणावर थोडा लगाम असावा.

सिंह (शुभ रंग- मरून )

आज जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवायचा तुमचा अट्टाहास असेल. आज घराबाहेर व घरातही वादविवाद टाळायला हवेत. जोडीदाराशी सुसंवाद असणे हिताचे.

कन्या ( शुभ रंग- हिरवा)

कार्यक्षेत्रात आज काही मनाविरुद्ध घडामोडींचा सामना करावा लागेल. कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमाखर्चाचा तराजू थोडा डळमळीत होईल. आज प्रवास घडतील.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज विचारांती घेतलेले निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग सोपा होईल. तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल अनुकूल दिवस.

वृश्चिक (शुभ रंग- निळा)

आज रिकामटेकड्या चर्चेपेक्षा प्रत्यक्ष कृतीस प्राधान्य दिल्यास कार्यक्षेत्रात यश सोपे होईल. अनुभवींचे सल्ले आज अवश्य घ्या. अहंकारास मात्र लगाम हवा.

धनु- (शुभ रंग- आकाशी)

उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने आज थोडा प्रतिकूल दिवस असल्याने मोठे आर्थिक व्यवहार जपून करायला हवेत ज्येष्ठ मंडळींनी सल्ले न देता सत्संगात रमणेच हिताचे.

मकर ( शुभ रंग- क्रीम )

उद्योग व्यवसायात आर्थिक धाडस मर्यादेबाहेर नको. कमी गुंतवणुकीत जास्त लाभाचा मोह तर नकोच. आज तुम्ही कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)

उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड द्याल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जोडण्यात यशस्वी मध्ये जास्ती कराल.

मीन -(शुभ रंग – केशरी)

नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज जोडीदार जे म्हणेल त्याला होच म्हणणे हिताचे राहील.

शुभम भवतु 

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: