ग्लोबल न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 10 July 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
आजचे पंचांग –
वार – सोमवार
10.07.2023.
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – रेवती 18.59 पर्यंत नंतर अश्विनी.
चंद्र राशी – मीन 18.59 पर्यंत नंतर मेष.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- पांढरा )
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होऊ शकते सावध रहा.
वृषभ (शुभ रंग- गुलाबी )
कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र दूरच रहा. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.
मिथुन ( शुभ रंग- हिरवा )
नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकार योग चालून येतील. वडील आज तुम्हाला योग्य सल्ले देतील. सकारात्मक दृष्टिकोन बाळगून प्रथम कर्तव्यास प्राधान्य द्या.
कर्क (शुभ रंग- राखाडी.)
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येऊ शकते. आज हातचे सोडून पळत्या मागे अजिबात जाऊ नका. झटपट लाभाचा मोह तर टाळायलाच हवा. स्वतःवर संयम ठेवा.
सिंह (शुभ रंग- क्रीम )
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआप वळतील.
कन्या ( शुभ रंग- तांबडा)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धात उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपूनच करायला हवेत. भागीदारीच्या व्यवहारात काही मतभेद संभवतात.
तूळ ( शुभ रंग- मरून)
नोकरदारांवर वरिष्ठांचा वरदहस्त राहील. आज तुमची तब्येत थोडी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधे काही मतभेद असतील तर ते सामंजस्याने मिटू शकतात.
वृश्चिक (शुभ रंग- डाळिंबी)
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ लाभेल. स्वतःचे छंद जपण्यासाठी वेळही काढू शकाल. तुमच्या कामातील उत्साहाचा विरोधकांनाही हेवा वाटेल.
धनु- (शुभ रंग- डाळिंबी)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आज स्थावरचे व्यवहार लाभ देतील. मातोश्रींचे सल्ले ही महत्त्वपूर्ण असतील.
मकर ( शुभ रंग- सोनेरी )
जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणे योग्य ठरेल. गृहिणींना आज थोडा थकवा जाणवेल, विश्रांतीची गरज भासेल.
कुंभ (शुभ रंग – चंदेरी)
धंद्यात येणे अनपेक्षित पणे वसूल होईल. मृदू वाणीने आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवा.
मीन -(शुभ रंग-जांभळा )
महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा. तुमच्या लहरी व संशय स्वभावावर ताबा ठेवायला हवा.
शुभम भवतु.
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क – 9689165424