राशिभविष्य- जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 14 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – बुधवार.

14.06.2023

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस.

आज विशेष- योगिनी एकादशी.

राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – अश्विनी 13.40 पर्यंत नंतर भरणी.

चंद्र राशी – मेष.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- पिस्ता )

आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल. मन हळवे करणारा एखाद्या प्रसंग घडेल. तुम्ही जशास तसे या धोरणाने वागा. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )

आज तुम्हाला काही अत्यावश्यक देणे चुकवावी लागतील. दूरच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. कठोर बोलून आपल्या हितचिंतकांनाच दुखावू नका. प्रलोभने टाळा.

मिथुन ( शुभ रंग- निळा )

जसे चिंताल तसेच होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस.

कर्क (शुभ रंग- मोरपिशी)

उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. अधिकार योग चालून येतील. हाताखालच्या लोकांवर तुमचा वचक राहील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

सिंह (शुभ रंग- क्रीम )

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत आज अवश्य घ्या. वाहतुकीचे नियम मोडलेत तर दंड चुकणार नाही. आपल्या मर्यादेत रहा.

कन्या ( शुभ रंग- भगवा)

नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. गाडी चालवताना ओव्हरटेक नको.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. वाद विवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)

काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना आज कोणत्याही स्पर्धेत निर्विवाद यश मिळेल.

धनु- (शुभ रंग-मरून)

आज तुम्ही उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. व्यक्तिमत्व विकासावर आज भर द्याल. गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील. आज सहकुटुंब चैन कराल

मकर ( शुभ रंग- निळा )

धंद्यातील येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करता येईल. आज फक्त गोड बोलून आपला स्वार्थ साधा, आज इतरांच्या भानगडीत अजिबात पडू नका.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी)

दिवसाच्या पूर्वार्धातच काही येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज शक्यतो प्रवासाची दगदग टाळा.

मीन -(शुभ रंग – लाल )

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झोपणारी कामे सहजच पूर्ण कराल.व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुमच्यातील मीपणा वाढण्याची आज शक्यता आहे.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क-9689165424

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: