आजचे राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 27 February 2023
वार – सोमवार.
27.08.2023
शुभाशुभ विचार- 16 नंतर चांगला दिवस.
आज विशेष- दुर्गाष्टमी.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – रोहिणी.
चंद्र राशी – वृषभ.
—————————————-


मेष (शुभ रंग – तांबडा)
आज कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा व नेतृत्वाचा ही चांगला प्रभाव पडेल. धनस्थानातील चंद्रभ्रमण तुमची आवक वाढवेल. गृहिणी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करतील.

वृषभ (शुभ रंग – पिस्ता)
कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा हट्ट असेल. मोठेपणा सांभाळण्यासाठी काही खर्चही कराल. इतरांना दिलेले शब्द आवर्जून पाळण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)
काहींना तातडीचे दूरचे प्रवास घडतील. आज वायफळ खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. तरुणांना विविध प्रलोभने आकर्षित करतील. खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा आहे.

कर्क (शुभ रंग – केशरी) – Today’s Horoscope 27 February 2023
व्यवसायात उलाढाल वाढेल. नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. जिवलग मित्र व आप्तस्वकियांत तुमच्या शब्दाला किंमत राहील. आज हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल राहील.

सिंह (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आपल्या कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे लागेल. अधिकारी वर्गास आज अधिकार वापरावेच लागतील. आपल्या व्यक्तिमत्व विकासावरही भर द्यावा लागेल.

कन्या (शुभ रंग – लाल)
तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ राहील नोकरीत वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज नास्तिक मंडळी ही देवाला एखादा नवस बोलून बघतील.

तूळ (शुभ रंग – पांढरा)
कोणतीही धाडसाची कामे आज टाळा. झटपट लाभाचा मोह तर अजिबात नको. विवाह विषयक बोलणे आज करू नका जास्त लाभाच्या अशाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.

वृश्चिक (शुभ रंग – डाळिंबी)
व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्याच प्रभावाखाली राहील. आज तुम्ही कारण नसताना इतरांच्या भानगडीत डोकवाल.

धनु (शुभ रंग – क्रीम)
नोकरदारांसाठी अनुकूल दिवस असून वरिष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील. तुमची काही येणे असतील तर ती वसूल होण्याची ही शक्यता आहे

मकर (शुभ रंग – मोरपंखी)
आज तरुण वर्गाचा हाऊस मौज करण्याकडे कल असेल. उच्च राहणी व उच्च विचारसरणी अशा तत्वाने वागाल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. प्रकृती धडधकट राहील.

कुंभ (शुभ रंग – मोरपंखी)
आज नोकरदारांना ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल. मुलांची अभ्यासात उत्तम प्रगती दिसून येईल. कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील. गृहिणींना आज थोडा थकवा जाणवेल.

मीन (शुभ रंग – भगवा)
कार्यालयीन कामानिमित्त आज प्रवास घडतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील. गृहिणी शेजारधर्म जपतील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: