राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 11 January 2023
वार – बुधवार.
11.01.2023
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 1.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – मघा 11.50 पर्यंत नंतर पूर्व फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह.
—————————————-


मेष (शुभ रंग – चंदेरी)
उच्चशिक्षित मंडळींच्या महत्त्वकांक्षा वाढतील. सौंदर्य प्रसाधनांचे व्यवसाय आज तेजीत चालतील. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळी आज उत्कृष्ट कामगिरी करून दाखवतील.

वृषभ (शुभ रंग – निळा)
अत्यंत सकारात्मकतेने आजच्या दिवसाची सुरुवात कराल. आज तुम्ही गरजूंच्या कामी याल. गृह सौख्याचा दिवस असून कौटुंबिक सदस्यात खेळीमळीचे वातावरण राहील.

मिथुन (शुभ रंग – हिरवा)
कार्यक्षेत्रात विरोधकांनाही चहा पाजूनच आपला स्वार्थ साधून घ्यावा लागेल. आज बेरोजगारांना नोकरीच्या संधी चालून येतील. आज आलेली कुठलीही संधी वाया घालवू नका.

कर्क (शुभ रंग – पांढरा)
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

सिंह (शुभ रंग – सोनेरी)
आज कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी आज तुमच्या हातून होईल.

कन्या (शुभ रंग – मोरपिशी)
आज तुमच्या काटकसरी वृत्तीस थोडा लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. घरात थोरांच्या होला हो करून वाद आवरते घ्या. प्रवासात तब्येत जपा.

तूळ (शुभ रंग – क्रीम)
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरदारांच्या रास्त मागण्या वरिष्ठ मान्य करतील. वास्तु वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होऊ शकते.

वृश्चिक (शुभ रंग – लाल) – Today’s Horoscope 11 January 2023
तुमच्या कार्यक्षेत्रातील अतिव्यस्ततेमुळे आज तुम्हाला कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागू शकते. नोकरदारांना वरिष्ठांच्या मागेपुढे करावेच लागणार आहे. आज अति व्यस्त दिवस.

धनु (शुभ रंग – सोनेरी)
घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. ज्येष्ठ मंडळी आज सत्संगात रमतील. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेत रहा. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैव नक्की साथ देईल.

मकर (शुभ रंग – डाळिंबी)
आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. आपल्या कुवती बाहेर जबाबदाऱ्या स्वीकारूच नका. गोड बोल्या मंडळींपासून लांबच रहा. पत्नी सांगेल ते योग्यच असेल.

कुंभ (शुभ रंग – डाळिंबी)
उद्योगधंद्यातील वाढत्या स्पर्धेस समर्थपणे तोंड देऊ शकाल. अडचणीत जोडीदाराची खंबीर साथ राहील. आज तुम्ही एखादा विवाह जुळवण्यात यशस्वी मध्यस्थी कराल.

मीन (शुभ रंग – पिस्ता)
नोकरदारांवर कामाचा वाढता ताण राहील आज तुम्हाला काही जुन्या चुका निस्तराव्या लागतील. आज फार खोलात न शिरता जोडीदार जे म्हणेल त्याला होच म्हणून विषय संपवणे हिताचे राहील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क – 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: