Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

by ग्लोबल न्युज नेटवर्क
December 18, 2022
in महाराष्ट्र
0
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 18 December 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – रविवार.

18-12-2022

शुभाशुभ विचार- 16 नंतर चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – संध्याकाळी 4.30 ते 6.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – हस्त 10.18 पर्यंत नंतर चित्रा.

चंद्र राशी – कन्या 22.31 पर्यंत नंतर तुळ.

आजचे राशिभविष्य

मेष – ( शुभ रंग- क्रीम )

व्यावसायिक मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. जुनी दुखणी अंगावर काढू नका. जोडीदाराबरोबर आज जरासे नमतेच घेणे हिताचे राहील.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)

कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकीनऊ येतील. मुले आज अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची उठबस अगत्याने करतील.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूना आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज प्रॉपर्टी चे व्यवहारात फायदा होईल. आई महत्त्वपूर्ण सल्ले देईल.

कर्क (शुभ रंग- मोतिया.)

आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. किरकोळ कारणावरून शेजारी आज रुसून बसतील. स्पष्ट वक्तेपणास आवर घालायला हवा नाहीतर नाती दुरावतील. गृहिणींना माहेरची ओढ लागेल.

सिंह (शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. कुणाचीही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. घाई गर्दीत घेतलेले काही निर्णय चुकतील. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवा.

कन्या ( शुभ रंग- पांढरा)

आज महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा. तुमच्या लहरी व संशयी स्वभावावर नियंत्रण ठेवायला हवे.

Pune News : धायरी येथे सदनिकेस आग; पती-पत्नी जखमी

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका कदाचित आज संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवेल कि जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.

वृश्चिक (शुभ रंग- केशरी)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या आज दुर्लक्षित होतील.

धनु- (शुभ रंग- निळा )

आज काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. नोकरदारांना अधिकाऱ्यांच्या दडपणात काम करावे लागेल. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य द्यावे. अतिव्यस्त दिवस.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. नास्तिकही आज देवाला एखादा नवस बोलतील. घरात एखादे देव कार्य करण्याचे बेत आखाल. दैवाची साथ राहील.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी )

व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ असेल. कुटुंबास पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )

धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आज तुम्हाला विश्रांती ही आवश्यक आहे.

 

 

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क 9689165424

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: राशिभविष्य
ADVERTISEMENT
Next Post
महाराष्ट्र पेटला नाही, तुमची पेटलेली वात विझायला आली, शीतल म्हात्रे यांचा आघाडीचा टोला

महाराष्ट्र पेटला नाही, तुमची पेटलेली वात विझायला आली, शीतल म्हात्रे यांचा आघाडीचा टोला

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group