राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 19 November 2022
वार – शनिवार.
19.11.2022
शुभाशुभ विचार- 10 नंतर चांगला दिवस.
आज विशेष- साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तरा.
चंद्र राशी – कन्या.
—————————————-


मेष – ( शुभ रंग- क्रीम )
व्यावसायिक मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी त्रस्त करतील. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो आहे.

वृषभ (शुभ रंग- राखाडी)
कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना नाकीनऊ येतील. मुले आज अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची उठबस अगत्याने करतील.

मिथुन ( शुभ रंग- पिस्ता )
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूना आवर्जून मदत कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येणार आहेत.

कर्क (शुभ रंग- निळा.)
आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. किरकोळ कारणावरून शेजारी आज रुसून बसतील. स्पष्ट वक्तेपणास आवर घालायला हवा नाहीतर नाती दुरावतील.

सिंह (शुभ रंग- आकाशी)
आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. कुणाचीही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. घाई गर्दीत घेतलेले काही निर्णय चुकतील. हातचे सोडून पळत्या मागे राहू नका.

कन्या ( शुभ रंग- गुलाबी)
एखादी हरवलेली वस्तू सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल. घरात थोरा मोठ्यांच्या होला हो करून वादविवाद टाळा.

तूळ ( शुभ रंग- भगवा )
महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. अधिकारी वर्गास विदेश दौरे घडतील. हातचे सोडून मृगजळा मागे धावण्याचा मोह होईल.

वृश्चिक (शुभ रंग- केशरी)
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या आज दुर्लक्षित होतील.

धनु- (शुभ रंग- चंदेरी )
आज काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. नोकरदारांना अधिकाऱ्यांच्या दडपणात काम करावे लागेल. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य द्यावे. अतिव्यस्त दिवस.

मकर ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. नास्तिकही आज देवाला एखादा नवस बोलतील. घरात एखादे देव कार्य करण्याचे बेत आखाल. दैवाची साथ राहील.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी )
व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ असेल. कुटुंबास पुरेसा वेळ देण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

मीन -(शुभ रंग – मोरपंखी )
धंद्यातील येणी वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. जुनी दुखणी मात्र अंगावर काढू नका. आज तुम्हाला विश्रांती ही आवश्यक आहे.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: