राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

मेष: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल.

वृषभ – आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक दृष्टया व्यस्त राहण्याचा आहे. एखाद्या काळजीमुळे मनावर ताण येऊन मन:स्वास्थ्य मिळू शकणार नाही.

मिथुन – आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जातील.

कर्क – आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. नोकरी – व्यवसाय करण्यार्‍यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील व त्यामुळे पदोन्नती होऊ शकते.

सिंह – आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल.

कन्या –  आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज नवीन कामे सुरू केल्यास त्यात अडचणी येतील. बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते. मन रागीट होईल, म्हणून बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल.

तूळ – आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस यशस्वितेचा व आनंदाचा आहे. सार्वजनिक जीवनाशी संबंधीत कार्यात यशस्वी व्हाल. आज आपल्यावर भिन्नलिंगी व्यक्तीचा प्रभाव राहील. मौजमजे साठी खर्च होईल.

वृश्चिक – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शक्यतो आज शांत राहावे. मन चिंतीत राहील व संबंधीतांशी मतभेद होतील. आरोग्या विषयी काळजी लागून राहील. यशहानी किंवा धनहानी होऊ शकते. एखाद्या स्त्रीमुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवत असल्याने शक्यतो जलाशया पासून दूर राहावे.

धनु – आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज कार्यपूर्ती न झाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे.

मकर – आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्याने मनाची बेचैनी वाढेल.

कुंभ – आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज आपण तना – मनाने प्रसन्न व्हाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल.

मीन – आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: