राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 8 October 2022
शनिवार.
तारीख 08.10.2022
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30
दिशा शूल- पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- पूर्वा भाद्रपदा 17.08 पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा.
चंद्र राशी- कुंभ 11.23 पर्यंत नंतर मीन.
————————————–


मेष – शुभ रंग-स्ट्रॉबेरी
आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवस लाभाचा.

वृषभ- शुभ रंग- सोनेरी – Today’s Horoscope 8 October 2022
आज तुम्ही भावने पेक्षा जास्त कर्तव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न मात्र दुर्लक्षित होणार आहेत. कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागेल.

 

मिथुन- शुभ रंग-चंदेरी
आज तुम्हाला दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यशाची खात्री बाळगायला हरकत नाही. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आ. सजनांचा सहवास लाभेल.

कर्क- शुभ रंग- जांभळा
आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हीतशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असू शकतील. कोणतीही धाडसाची कामे आज नको. सावध रहा

 

सिंह – शुभ रंग-मोरपिशी
कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.

कन्या- शुभ रंग- पिस्ता
आज कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमची काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की असेल.

 

तूळ- शुभ रंग- पांढरा
नवोदित कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात येतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. आज बरेच दिवसांनी जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात रमाल.

वृश्चिक – शुभ रंग- डाळिंबी
आज काही घरगुती प्रश्नात लक्ष देणे गरजेचे वाटेल. मुलांच्या अभ्यासातही डोकावणे आवश्यक आहे. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

 

धनु- शुभ रंग-निळा
शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल. काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर रगावर लगाम ठेवा. आईच्या आज्ञेत रहा.

मकर- शुभ रंग-निळा
वाढत्या खर्चातही पैशाची कमतरता भासणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी थोडी भटकंती होईल.

 

कुंभ- शुभ रंग- जांभळा
एखाद्या समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. उपवरांना मनजोगत्या स्थळांचे प्रस्ताव येतील. अति उत्साहाच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल.

मीन- शुभरंग- क्रीम
आज दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही नको. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका मारल उंची वस्त्र खरेदी कराल. आज संध्याकाळी हरवलेले गवसेल.

 

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: