दिवाळीपूर्वी सामन्यांना झटका पेट्रोल आणि CNG च्या दरात मोठी वाढ

 

देशात गेल्या काही दिवसापासून महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. आता पुन्हा दिवाळी अगोदर सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे.सीएनजीच्या किमतीत प्रति किलो ३ रुपयांनी वाढ केली आहे. तर पीएनजीच्या किमतीही ३ रुपयांनी वाढवल्या आहेत. सणासुदीच्या पार्श्वभूमिवर ही वाढ झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

सीएनजी गॅस दरात तीन रुपयांनी वाढ झाली आहे. या अगोदर दिल्लीत सीएनजी गॅस ७५ रुपये ६१ पैशांना मिळत होता, आता ७८ रुपये ६१ पैशांनी हा गॅस मिळणार आहे. तर नोएडा मध्ये याअगोदर ७८ रुपये १७ पैशांनी सीएनजीचे दर होते. आता सीएनजी ८१ रुपये १७ पैशांनी मिळणार आहे. काल ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी नव्या दरांची घोषणा केली. हे दर आज सकाळी ६ वाजल्यापासून लागू करण्यात आले आहेत.

मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामलीमध्ये सीएनजी आता ८५.८४ रुपये प्रति किलो, तर गुरुग्राममध्ये ८६.९४ रुपये, रेवाडीमध्ये ८९.०७ रुपये, कर्नालमध्ये ८७.२७ रुपये प्रति किलो आणि कैथल. कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरमध्ये सर्वाधिक किंमत ८९.८१ रुपये प्रति किलो असणार आहे. तर अजमेर, पाली आणि राजसमंदमध्ये ८८ रुपये ८८ पैसे प्रति किलो एवढा दर असणार आहे.

काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्रालयाने नैसर्गिक वायूच्या दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली होती. याअगोदर पहिल्यांदा मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडने दोन दिवसांपूर्वी दरात वाढ केली होती. आणि आता दिल्ली, दिल्ली एनसीआर तसेच पश्चिम उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सीएनजी उपलब्ध असलेल्या शहरांमधील किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Team Global News Marathi: