राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

: आजचे पंचांग – Today’s Horoscope 15 September 2022

वार – गुरुवार.

तारीख 15-09-2022

शुभाशुभ विचार- 8 प. चांगला दिवस.

आज विशेष – षष्ठी श्राद्ध.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00

दिशा शूल- दक्षिणेस असेल.

आजचे नक्षत्र- भरणी 8.05 पर्यंत नंतर कृतिका.

आजची चांद्रारशी – मेष 14.29 पर्यंत नंतर वृषभ.

————————————–

आजचे राशिभविष्य

मेष – शुभ रंग- डाळिंबी

आज अति उत्साहाच्या भरात तुम्ही काही चुकीचे निर्णय घ्याल. विवाहेच्छुकांना मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. आज एखाद्या सभा समारंभात तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल.

वृषभ- शुभ रंग- मोतिया

आजचा दिवस खर्चाचा असल्याने बचतीचा विचारही करू नका. संध्याकाळी एखाद्या मॉलमध्ये फेरफटका माराल. उंची वस्त्रे खरेदी कराल. स्वतःचे लाड पुरवाल. आज संध्याकाळी एखादी हरवलेली वस्तू सापडेल.

 

मिथुन- शुभ रंग- हिरवा

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. जिवलग मित्र तुमचा शब्द झेलतील. दिवसाच्या पूर्वार्धात एखादा लाभ संभवतो.

कर्क- शुभ रंग- पिस्ता

आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. कदाचित कुटुंबीयांची नाराजी पत्करावी लागणार आहे. दगा देणारे मित्र भेटतील.

 

सिंह -शुभ रंग- मोरपंखी.

आज तुम्हाला दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश हमखास मिळेल. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत आखाल. सज्जनांचा सहवास लाभेल.

कन्या- शुभ रंग- निळा

आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हितशत्रू कदाचित मित्रांमध्येच लपलेले असण्याची शक्यता आहे. कोणतेही धाडसाची कामे आज करू नका. सतर्क रहा.

 

तूळ- शुभरंग- आकाशी

कौटुंबिक वातावरण सामंजस्याचे असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची आज खंबीर साथ मिळेल.

वृश्चिक- शुभ रंग- भगवा

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमची काही येणी असतील तर ती वसूल होऊ शकतील. प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. जरा खाण्यापिण्यावर नियंत्रण असलेले बरे.

 

धनु- शुभ रंग- स्ट्रॉबेरी

कलाकार मंडळी प्रसिद्धीच्या झोतात राहतील. हौशी मंडळींना चैन करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल. जुन्या मित्रमंडळींच्या सहवासात आजची संध्याकाळ मजेत जाईल.

मकर- शुभरंग- राखाडी

आज काही घरगुती प्रश्नात लक्ष घालणं गरजेचे आहे. गृहिणींना मुलांच्या अभ्यासातही डोकवावे लागेल. काही रसिक मंडळी सहकुटुंब एखाद्या सहलीचे नियोजन करतील.

 

कुंभ- शुभरंग-पांढरा

शेजाऱ्यांशी झालेले मतभेद दूर होऊन सलोखा वाढेल काही जणांना आज तातडीने प्रवासासाठी निघावे लागेल. घराबाहेर क्रोधावर लगाम ठेवणे गरजेचे आहे. मुलांनी आईच्या आज्ञेत राहावे.

मीन- शुभरंग- गुलाबी

कितीही खर्च वाढला तरी पैशाची कमतरता जाणवणार नाही. आज संध्याकाळी काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. महत्त्वाच्या कामासाठी आज थोडी भटकंती होईल.

 

 

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी

( ज्योतिष व वास्तु सल्लागार)

फोन 9689165424

ग्लोबल न्युज नेटवर्क: