फॉक्सकॉनवरील जयतं पाटलांच्या दाव्याला भाजप आमदार साटम यांचं प्रतिउत्तर

 

मुंबई | राज्यात वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पावरुन राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. महाविकास आघाडी आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी वेदांत फॉक्सकॉ प्रकल्प महाराष्ट्रातून जाणूनबुजून काढून घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याला भाजपचे आमदार अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पाटलांचा हा दावा साटम यांनी फेटाळून लावला आहे.

अनेक महिन्यांपासून वाटाघाटी होऊनही कंपनीने महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा लगावला आहे. यावर भाजप आमदार अमित साटम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. साटम यांनी जयंत पाटील यांना आव्हान देत प्रकल्पाबाबतचे तथ्य पत्रक आपल्याकडे असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्रात प्रकल्प व्हावा यासाठी महाविकास आघाडीन सरकारनं खूप प्रयत्न केल्याचा जयंत पाटील यांचा दावा सपशेल खोटा आहे. दावे उघड करण्यासाठी आम्हाला प्रकल्पाची टाइमलाईन समजून घ्यावी लागेल असे साटम यांनी म्हटलं आहे. ऑगस्ट 2015 मध्ये, फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारनं सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. फॉक्सकॉननं सेमी-कंडक्टर उद्योगात 15 अब्ज डॉलर गुंतवण्याचा निर्णय घेतला.

मात्र जून २०२० मध्ये, महाविकास आघाडीन सरकारनं मंत्री शुभाष देसाई यांनी सामंजस्य करार रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारनं सत्तेवर असताना ‘न परवडणाऱ्या’ धोरणामुळं महाराष्ट्रातील गुंतवणूक रद्द झाली होती असे साटम यांनी म्हटलं आहे. कंपनीने हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि तेलंगणापेक्षा महाराष्ट्राला प्राधान्य दिले होते. कारण अशा उद्योगासाठी ‘महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक धोरण 2016’ आवश्यक असलेले हे एकमेव राज्य होते. हे धोरण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आणले होते असंही साटम यांनी सांगितले.

 

Team Global News Marathi: