राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 12 August 2022
शुक्रवार.
12.08.2022
शुभाशुभ विचार – क्षयदिन.
आज विशेष – वरद लक्ष्मी व्रत.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल -पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – धनिष्ठा.
चंद्र राशी – मकर 14.19 पर्यंत नंतर कुंभ.
—————————————-


आजचे राशीभविष्य – Today’s Horoscope 12 August 2022
मेष – ( शुभ रंग- डाळिंबी)
व्यावसायिक नवे करार यशस्वी होतील. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. एखाद्या रखडलेल्या मोठ्या रकमेची वसुली होऊ शकेल.
वृषभ – (शुभ रंग- राखाडी)
नोकरीच्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त फार खोलात शिरू नका. वरिष्ठांना काही सुचवण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. अडचणी आज देवालाच सांगितलेल्या बऱ्या.

मिथुन – (शुभ रंग -स्ट्रॉबेरी)
नवीनच झालेल्या ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. आज काही गोड बोली माणसे भेटतील झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे राहील. आज कामापुरतेच बोला.
कर्क – ( शुभ रंग – सोनेरी)
आज सभा संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. इतरांना योग्य सल्ले द्याल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. महत्वाच्या चर्चेत अग्रेसर राहाल. आनंदी दिवस.

सिंह- ( शुभ रंग- पांढरा )
आज फक्त कष्ट करीत रहा, फळाची अपेक्षा मात्र उद्या करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. वैवाहिक जीवनात दुपारनंतर एकमत राहील.
कन्या- (शुभ रंग – गुलाबी)
चंगळवादी व विलासी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. पैसा उडवायचे अनेक मार्ग सुचतील. आज आरोग्य उत्तम राहील.

तूळ – (शुभ रंग – मोरपिशी )
कुटुंबात आज आर्थिक सुबत्ता नांदेल. गृहिणी घर सजावटीवर खर्च करतील. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे. आज प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील.
वृश्चिक-( शुभ रंग- पिस्ता)
व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागेल काही तत्त्वही गुंडाळून ठेवावी लागणार आहेत. आज काहीजणांचे घर मालकांशी मतभेद होतील. शेजारी आज आपलेपणाने डोकावतील.

धनु – ( शुभ रंग- नारिंगी)
सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. वक्त्यांची भाषणे आज प्रभावी होतील. शेजारी आज कुत्सित नजरेने बघतील. आज संध्याकाळी एखाद्या घरगुती कार्यक्रमास हजेरी लावाल.
मकर – ( शुभ रंग- जांभळा)
अति धावपळ टाळा. हार्डवर्क पेक्षा स्मार्ट करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येणार आहे त्याचा वेळीच फायदा घ्या. निर्णय घेण्यास विलंब लावू नका.

कुंभ – ( शुभ रंग -चंदेरी)
कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होइल. आज कोणतीही रिस्क घेऊ नका कायद्याची चौकट मोडू नका. दुपारनंतर हरवलेले गवसेल.
मीन – ( शुभ रंग- मरून )
वास्तू किंवा वाहन खरेदीसाठी केलेले कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विद्यार्थ्यांकडून कौतुकास्पद कामगिरी होईल. आज कमी श्रमात ही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन 9689165424.
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: