कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

प्रतिनिधी कळंब :- तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद म्हणजे मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवाची मिरवणूक 28 ऐवजी 29 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे .या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. यंदा ईद-ए-मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच दिवशी येत आहे . कळंब शहरातून दोन्ही उत्सवांच्या हजारांच्या संख्येत मिरवणूक निघतात .त्यामुळे कोणतीही अघटीत घटना घडू नये यासाठी शहरातील सकल मुस्लिम बांधवांनी त्या दिवशी मिरवणूक न काढता दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे . कळंब शहरात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकमेकांचे सण उत्सव साजरे करत असतात .ईद-ए-मिलाद ,शिवजन्मोत्सव ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकत्र येऊन साजरी करतात .परंतु राज्यात सुरू असलेल्या घटना लक्षात घेता कळंबच्या प्रथा परंपरेला गालबोट लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या निर्णयाचे कौतुक होत आहे.

Team Global: