राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – वार – रविवार, दि. 12. 06.2022 (Todays Horoscope 12 June 2022)

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – प्रदोष. शिवराज्याभिषेकोत्सव दिन

राहू काळ – सायंकाळी 04.30 ते 06.00

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – विशाखा.

चंद्र राशी – तुळ 13.06 पर्यंत नंतर वृश्चिक.

________________________

आजचे राशीभविष्य – (Todays Horoscope 12 June 2022)

मेष – (शुभ रंग – राखाडी)

हौस मौज जरूर करा. करा परंतु आपल्या मर्यादा सांभाळाव्या. कुसंगती पासून लांब रहा. वाहन चालवताना जरा जपून. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

वृषभ – (शुभ रंग – डाळिंबी)

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग सहज सोडवू शकाल. वैवाहिक जीवनात लाडिक रुसवे-फुगवे असतीलच.

मिथुन – (शुभ रंग- पिस्ता )

काही जुन्या आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. पथ्यपाणी नाही पाळले तर आजार बळावण्याची शक्यता आह. विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेत यश मिळेल.

कर्क – (शुभ रंग- क्रीम )

हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. महत्त्वाच्या कामाला आज विलंब होणार आहे. रुग्ण आज ठणठणीत बरे होतील. कोर्टाची पायरी न चढलेली बरी.

सिंह – (शुभ रंग- जांभळा)

कार्यक्षेत्रात पूर्वीच्या अथक परिश्रमाचे फळ दृष्टिक्षेपात येईल. कला व क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमप्रकरणे डोक्याला ताप देतील.

कन्या – (शुभ रंग- सोनेरी)

कार्यालयीन कामासाठी काही जवळपासचे प्रवास घडू शकतात. प्रॉपर्टी च्या व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. संततीकडून आज काही सुवार्ता येतील. विनाकारण एखादे टेंशन घ्याल.

तुळ – (शुभ रंग – लाल)

आज अनपेक्षित रित्या काही रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर खर्चही विविध मार्ग तुम्हाला खुणावतील. विविध जाहिराती गृहिणींना भुरळ घालतील.

वृश्चिक – (शुभ रंग- चंदेरी)

आज तुम्ही आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत राहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. अति आत्मविश्वास आर्थिक नुकसानास कारणीभूत ठरू शकेल.

धनु – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज रिकामटेकड्या चर्चेत तुमचा बराच वेळ फुकट जाईल. काही महत्त्वाची कामे दुर्लक्षित होतील. आज हार्डवर्क पेक्षा स्मार्ट वर्क करण्याकडे तुमचा कल राहील.

मकर – (शुभ रंग- पांढरा)

उच्चशिक्षित असाल तर मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घेण्यास विलंब लावाल तर संधी हुकतील. मित्रमंडळीत आज तुमच्या शब्दाचा मान राहील. छान दिवस.

कुंभ – (शुभ रंग- निळा)

अविश्रांत मेहनतीच्या जोरावर ध्येयाकडे आज तुमची वाटचाल सुरू राहील. मित्रांपासून दोन हात लांबच राहा. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

मीन – (शुभ रंग- गुलाबी)

आज नोकरीत कामाचा प्रचंड ताण राहील. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडतील. वरिष्ठांशी नमते घ्यावे व सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे. कायदा मोडण्याचा विचारही करू नका.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: