आजचे पंचांग – वार – शुक्रवार, दि. 03.06.2022 (Todays Horoscope 03 June 2022)
शुभाशुभ विचार – 14.00 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष – विनायक चतुर्थी.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – पुनर्वसु 19.05 पर्यंत नंतर पुष्य
चंद्र राशी – मिथुन 12.20 पर्यंत नंतर कर्क.
________________________
आजचे राशी भविष्य (Todays Horoscope 03 June 2022)
मेष – (शुभ रंग- राखाडी)
कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवावी. व्यवसायात मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या.
वृषभ – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घेतलेली बरी. त्यानंतर थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्त्वाची मेल्स येणार आहेत. दुपारनंतर तातडीने प्रवासास निघाल.
मिथुन – (शुभरंग- तांबडा)
तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होतील. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. प्रभावी वक्तृत्वाने समोरच्या व्यक्तीस प्रभावित कराल.
कर्क – (शुभ रंग – क्रीम)
महत्त्वाचे व्यावसायिक करार आज दुपारनंतर करावेत. काही हरवले असल्यास पुन्हा शोधा म्हणजे सापडेल. आज कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल.
सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्त्वपूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्यावेत. परदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होतील. जसे चिंताल तसेच होईल.
कन्या – (शुभ रंग- सोनेरी)
कार्यक्षेत्रात तुम्ही पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल व यश आता अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. क्षुल्लक कारणाने दुखावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.
तुळ – (शुभ रंग- पांढरा)
विरोधकांचा विरोध कमी होईल. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. एखाद्या जिवलग मित्राच्या मदतीस धावून जाल. इतरांच्या भल्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल.
वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी)
आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी उद्भवतील. काही मानसिक संतुलन बिघडवणारे प्रसंग घडतील. संध्याकाळी सत्संगाकडे आपोआप पावले वळतील. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल.
धनु – (शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही कुणाचेही ऐकून घेण्याच्या तयारीत नसाल. काही क्षुल्लक गोष्टींनी मानसिक स्वास्थ्य बिघडेल. महत्त्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळल्यात तर बरे होईल.
मकर – ( शुभ रंग- लाल)
कुटुंबातील काही आनंदी घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. प्रेम प्रकरणांना घरातील मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. खेळाडू स्पर्धा जिंकतील.
कुंभ – (शुभ रंग- पिस्ता)
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. आज काही गोड बोली माणसे भेटतील परंतु गाफील राहू नका. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश.
मीन – (शुभ रंग- मोरपंखी)
काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. उद्योग-धंद्यात उत्साही वातावरण राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. कलाकार संधीचे सोने करतील.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)