आजचे पंचांग – वार – गुरूवार, दि. 02.06.2022
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष — सामान्य दिवस.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – आर्द्रा 16.04 पर्यंत, नंतर पुनर्वसु.
चंद्र राशी – मिथुन.
_________________________
आजचे राशी भविष्य
मेष – (शुभ रंग- मोतिया)
आज तुमच्यासाठी संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग जास्त होईल. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. मातोश्रींशी काहीतरी बिनसले असेल.
वृषभ – (शुभ रंग- तांबडा)
अनपेक्षित रित्या काही येणी वसूल होतील. प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. आज वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. दैव आज तुमच्याच बाजूने आहे.
मिथुन – (शुभ रंग- पांढरा)
आज तुम्ही वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल. तुमचा उत्साह व कार्यक्षमताही वाढेल. कार्यक्षेत्र विस्तारेल. आर्थिक सुबत्ता येईल.
कर्क – (शुभ रंग – क्रीम)
हट्टीपणा सोडा, मनाच्या लहरीपणास आवर गरजेचा आहे. जमाखर्चाचा ताळमेळ बसवताना नाकी नऊ येतील. उधारी उसनवारी आज नको. विदेशाशी संबंधित व्यवसायात चांगले चालतील.
सिंह – ( शुभ रंग – हिरवा)
काही अनुकूल घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. आज इच्छापूर्तीचा दिवस असल्याने आपले विचारही सकारात्मक ठेवा. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.
कन्या – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या अधिकारात वाढ होईल. वाढीव जबाबदाऱ्या मात्र टाळता येणार नाहीत. मित्र आज दिलेली आश्वासने अजिबात पाळणार नाहीत. वडिलांनी दिलेले सल्ले डावलू नका.
तुळ – (शुभ रंग -आकाशी)
नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त आपले काम बिनचूक कसे होईल यावर लक्ष देणे हिताचे राहील. ज्येष्ठ मंडळींनी उपासनेत खंड पडू देऊ नये. नास्तिक ही देवाला एखादा नवस बोलतील.
वृश्चिक – ( शुभ रंग – जांभळा)
काही मानापमानाच्या प्रसंगाना तोंड द्यावे लागेल. आज थोडी संयमाची कसोटी राहील. आज फक्त आपला स्वार्थ बघा, परमार्थ झेपणारा नाही.
धनु – (शुभ रंग- निळा)
आज तुमची तब्येत जरी नरम असली तरी तुमच्या कामातील उत्साह दांडगा राहील. व्यवसायिकांची आवक उत्तम राहील. दूरच्या प्रवासात खोळंबा संभवतो.
मकर – (शुभ रंग – चंदेरी)
आज दिवस जरी तितकासा अनुकूल नसला तरी तुमची काही येणी असतील तर ती वसूल होतील. मामा मावशी यांच्याकडून काही शुभवर्तमान कळेल.
कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)
आज आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. काही फसव्या संधी येऊ शकतात. हातचे सोडून मृगजळामागे धावण्या पूर्वी पूर्ण विचार करावा. आज तुमचा चैन करण्याकडे कल राहील.
मीन – (शुभ रंग- भगवा)
उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. गृहिणींना शारीरिक थकवा जाणवेल.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)