अहिल्यादेवी होळकारांच्या जयंती दिनी कर्जत येथे झालेल्या कार्यक्रमात राजकीय वादविवाद पाहायला मिळाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांना पोलिसांनी चौंडीकडे जाताना अडवले होते. यानंतर राजकीय वादाची ठिणगी पडली होती. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी सडकडून टीका केली. तर राष्ट्रवादीने हा कार्यक्रम हायजॅक केला आहे, अशी टीका भाजपने केली होती.
यानंतर काही धनगर संघटनांच्या तक्रारीनंतर गोपिचंद पडळकरांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून पोलिसांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप पडळकरांकडून करण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर समाजात तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, अशा विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडळकर यांच्या चौडीतील भाषणानंतर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात रविंद्र पांडुळे यांनी तक्रार दिली आहे.
अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीसाठी मंगळवारी अनेक नेते चौंडीयेथे दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावर गोपीचंद पडळकर यांनी टीका केली होती. रोहित पवारांना अतात कशा अहिल्यादेवी आठवल्या, रोहित पवार काय अहिल्यादेवींचे वंशज आहेत का? असा प्रश्न पडळकरांनी विचारला होता. मात्र, मंगळवारी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना चौंडीला जाताना पोलिसांनी अडवले आणि हा राजकीय वाद पेटला.