राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

ग्लोबल न्यूज : आजचे पंचांग – वार – गुरुवार, दि. 25.11.2021

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – गुरुपुष्यामृत.( सूर्योदयापासून 18.49 पर्यंत)
राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – पुष्य 18.49 पर्यंत नंतर आश्लेषा नक्षत्र.
चंद्र राशी – कर्क.
—————————————

आजचे राशीभविष्य

मेष – ( शुभ रंग- पिस्ता)

आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस आहे. कुठेही न जाता घरीच आराम करावा असा तुमचा मूड असेल. मुलांना एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल.

वृषभ – (शुभ रंग- डाळिंबी)

आज तुम्हाला मुलांच्या काही शैक्षणिक समस्या भेडसावतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. महत्वाच्या कामासाठी भटकंती होईल.

मिथुन – ( शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे उत्तम सहकार्य राहिल. नेहमीच्या कामा व्यतिरिक्त एखादी अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागेल. तरुणांनी उद्धटपणास लगाम देणे गरजेचे आहे. कायदा तंतोतंत पाळा.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा)

आज कुठेही आपलीच मर्जी चालावी असा तुमचा हट्ट राहील. प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी पैसाही खर्च कराल. आपल्या सडेतोड बोलण्याने कुणाच्या तरी भावना दुखावतील.

सिंह – (शुभ रंग -आकाशी)

ज्येष्ठांनी प्रकृतीची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)

नवविवाहितांची स्वप्ने साकार होतील. व्यवसायातील उलाढाल वाढेल. सामाजिक जीवनातली प्रतिष्ठा वाढेल. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा अनपेक्षित लाभ संभवतो.

तूळ – (शुभ रंग- पांढरा)

नोकरीत आज वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. विरोधकांनाही आज चहा पाजून आपलेसे करावे लागेल. अहंकारास जरा लगाम द्या. थोडे वाका पण मोडू नका.

वृश्चिक – ( शुभ रंग -जांभळा)

आत्मविश्‍वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. क्षुल्लक कारणाने कारणाने घरातील मोठ्यांशी मतभेद संभवतात. जे काय करायचे ते मिटल्या तोंडी करा.

धनु – (शुभ रंग -मोरपंखी)

कुठलीही गोष्ट आज सहजसाध्य नसुन अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत आर्थिक व्यवहार नको. वैवाहिक जीवनात आज जोडीदारास फार प्रश्न विचारू नका.

मकर – (शुभ रंग- गुलाबी)

कार्यक्षेत्रात उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अथक प्रयत्ना शिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपून त्यांना रोजगार मिळेल. काही येणी असतील तर मागितल्याशिवाय मिळणार नाहीत.

कुंभ – ( शुभ रंग-मोतिया)

अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्‍नात लक्ष घालावे लागणार आहे. आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभाव काबूत ठेवा. संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट द्यावी लागेल.

मीन – (शुभ रंग-चंदेरी)

एखाद्या सामाजिक कार्यात आज पुढाकार घ्याल. गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. कलाकारांना उत्तम संधी मिळतील. गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: