राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल नवीन वर्षाचा पहिला दिवस तुमच्यासाठी

शनिवार 1 जानेवारी 2022 रोजी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा योग जुळून येत आहे. याचा अशुभ प्रभाव 12 पैकी 5 राशीच्या लोकांवर राहील. याच्या प्रभावाने काही लोक वादामध्ये अडकू शकतात. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना धनहानी होऊ शकते.

आरोग्याच्या बाबतीतही दिवस चढ-उताराचा राहील. लव्ह-लाईफसाठी दिवस काही लोकांसाठी ठीक नाही. शनिवारच्या या अशुभ योगामुळे 5 राशीचे लोक जास्त तणावात राहतील. इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस…

मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागतील. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत. चाललंय ते बरं चाललंय.

वृषभ : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. गृहीणींना आज गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.

मिथुन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
कर्तव्यास प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात कामाच्या प्रचंड व्यापामुळे आज महत्वाचे घरगुती प्रश्न होणार आहेत.

कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : १
उच्चशिक्षित मंडळींना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस.

सिंह : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
कार्यक्षेत्रात स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण कराल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. गरजूंना मदत कराल.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
बरेच दिवसापासून तुम्हाला अपेक्षित असलेली मेल्स येतील. शेजारी आज घरात आपुलकीने डोकावतील.

तूळ : शुभ रंग : पांढरा | अंक : ६
उद्योग धंद्यातील काही येणी आकस्मिकरीत्या वसूल हाेतील. तरूण मंडळी आज बेफिकीरपणे वागतील.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील.

धनु : शुभ रंग : निळा| अंक : ५
ज्येष्ठ मंडळी तिर्थाटनाचे बेत आखतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवणे गरजेचे आहे. यश सोपे नाही.

मकर : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
सर्व दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. समोरील व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. गुड न्यूज येतील.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज दैवची हमखास साथ मिळेल. साधकांना उपासनेेची प्रचिती येईल.

मीन : शुभ रंग : क्रिम| अंक : १
सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा करु नका. थोडी श्रध्दा सबूरी ठेवावी लागेल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: