राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – शुक्रवार, दि. 17 सप्टेंबर 2021.

शुभाशुभ विचार – सकाळी 8.00 नंतर चांगला दिवस.
आज विशेष – परिवर्तिनी एकादशी.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – श्रवण.
चंद्र राशी – मकर.
—————————————

आजचे राशीभविष्य –

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)

नवीन व्यावसायिक असाल तर आज येणी वसूल झाल्याने तुमच्या मनावरील दडपण कमी होईल. नोकरदार वरिष्ठांची मर्जी सांभाळू शकतील. आज कार्यक्षेत्रात श्रमसफल्याचे समाधान मिळवाल.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. विरोधकांशी गोड बोलूनच आपला कार्यभाग साधून घेणे हिताचे राहील. आज जरा युक्तीने वागा. आरोग्यासही जपा.

मिथुन- ( शुभ रंग- डाळिंबी)

आज जोखमीची कामे टाळलेलीच बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्याच्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

कर्क- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णय ही योग्य ठरतील. व्यवसायातील स्पर्धकांना ही तुमचा हेवा वाटेल. आज पत्नीच तुम्हाला योग्य सल्ले देईल.

सिंह- ( शुभ रंग- गुलाबी )

आपले म्हणणे इतरांना पटलेच पाहिजे अशी अपेक्षा करू नका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. आज ताकही फुंकून पिणे गरजेचे आहे.

कन्या-( शुभ रंग पांढरा )

तरुणांनी मौज मजा करताना कायद्याचे भान ठेवावे. बेफिकीर पणास लगाम गरजेचा आहे. व्यसने घात करतील. कला क्षेत्रातील मंडळींना मेहनतीचे फळ मिळेल.

तूळ-( शुभ रंग- पिस्ता)

आज स्थावर, शेतीवाडी संबंधित व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना मात्र रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागतील. गृहिणी गप्पांमधून गैरसमज पसरवतील.

वृश्चिक – (शुभ रंग- मोरपिशी)

भावनेच्या भरात कोणाला वचने देऊ नका. कितीही चांगले संबंध असले तरी कुणाला जामीन राहू नका. आज लहान भावाला तुमच्या मदतीची गरज भासेल.

धनु- ( शुभ रंग- जांभळा)

रिकाम्या चर्चेतून वाद होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

मकर-( शुभ रंग- नारिंगी)

आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच आहे. व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.

कुंभ – (शुभ रंग- मरून)

अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात दगदग होईल. बेरोजगारांनी घरापासून लांब जायची तयारी ठेवायला हवी. एखाद्या सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीचा विचार कराल.

मीन – ( शुभ रंग- चंदेरी)

आज आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठ्या लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज दिलेले शब्द पाळतील. एखादी मोठी रक्कम हाती येण्याची शक्यता आहे.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: