राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग  वार – मंगळवार, दि. 24 ऑगस्ट 2021
शुभाशुभ विचार – चांगला दिवस

आज विशेष – सामान्य दिवस

राहू काळ – दुपारी 03.00 ते 04.30

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा 19.47 पर्यंत, नंतर उत्तराभाद्रपदा

चंद्र राशी – कुंभ 13.38 पर्यंत नंतर मीन

—————————————

आजचे राशीभविष्य.

मेष – (शुभ रंग – पिस्ता)
दैनंदिन सर्व कामे सुरळीत पार पडतील. स्वतःचे काही छंद जोपासण्यासाठी वेळ मिळेल. आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस आहे. दुपारनंतर अचानक एखादा मोठा खर्च उद्भवेल.

वृषभ – (शुभ रंग – क्रीम)
नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होईल. तुमच्या अधिकारात वाढ होईल. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हिताचे आहे. पिताश्री योग्य सल्ला देतील. संध्याकाळी काही प्रिय मित्रांचा सहवास लाभेल.

मिथुन – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची उत्तम साथ मिळेल. ज्येष्ठ मंडळींना उपासनेचे फळ मिळेल.

कर्क – (शुभ रंग – सोनेरी)
काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. खाण्यापिण्यावर ताबा गरजेचा आहे अन्यथा पोट बिघाडण्याची शक्यता आहे. तरुणांनी चुकीची संगत टाळणे हिताचे राहील.

सिंह – (शुभ रंग – पांढरा)
आज नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील.  इच्छित ध्येय साध्य होतील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.

कन्या – (शुभ रंग – गुलाबी)
आज काही अप्रिय माणसे संपर्कात येतील. मोफत सल्लगार मंडळी भलतेच बोअर करतील. आज थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे हे लक्षात असूद्या.

तूळ – (शुभ रंग – मोरपिसी)
मंदावलेल्या व्यापार उद्योगास पूर्ववत गती येईल. आज तुम्हाला आपल्या आवडत्या क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळेल. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल.

वृश्चिक –  (शुभ रंग – केशरी)
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्णही कराल.  घराच्या नूतनीकरणाचे मनावर घ्याल. मुलांच्या अभ्यासातील प्रगतीने आनंदित व्हाल.

धनु – (शुभ रंग – आकाशी)
नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. आत्मविश्वासाचा ही अतिरेक नको, कारण त्याने निराशा पदरी पडू शकते.

मकर – (शुभ रंग – जांभळा)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने आज आत्मविश्वासाने स्वीकाराल. विरोधकांना आज तुम्ही चोख उत्तर द्याल. लहान भावंडांस मदत कराल.

कुंभ – (शुभ रंग – सोनेरी)
आज हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर महागात पडेल. एखादा शेरास सव्वाशेर भेटू शकतो सावध राहा.

मीन – (शुभ रंग – निळा)
आज आर्थिक व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. मोठ्या लाभाच्या मोहाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: