राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग वार – शुक्रवार, दि. 20 ऑगस्ट 2021

शुभाशुभ विचार – शुभ दिवस
आज विशेष – प्रदोष, वरदलक्ष्मी व्रत.
राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – उत्तराषाढा 21.25 पर्यंत नंतर श्रवण
चंद्र राशी – मकर
—————————————

आजचे राशीभविष्य.

मेष – (शुभ रंग – राखाडी)
व्यवसायात भिडस्तपणास लगाम घालणे गरजेचे आहे. काही निर्णय आज झटपट घ्यावे लागतील. आलेली कुठलीच संधी सोडू नका. मित्रमंडळींना आज दुरूनच राम राम करा.

वृषभ – (शुभ रंग – सोनेरी)
वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील पण तुम्ही त्यांच्या वयाच्या मान राखाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशीही नमते घ्यावे लागेल. आज अहंकारास सुट्टीच देणे हिताचे राहील.

 

मिथुन – (शुभ रंग – चंदेरी)
आज उतावीळपणे कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. महत्त्वाच्या चर्चा, वाटाघाटी उद्यावर ढकलाव्यात.

कर्क – (शुभ रंग – गुलाबी)
बरेच दिवसांनी आज तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येईल. कवींना प्रेमगीते सुचतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी असे वातावरण असेल.

 

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. भावनेच्या भरात कोणाला शब्द देऊन अडकू नका.

कन्या – (शुभ रंग – पिस्ता)
काही नव्या ओळखी होतील तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. तुम्हाला एखाद्या नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावे लागणार आहे.

 

तूळ – (शुभ रंग – पांढरा)
आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. कौटुंबिक वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना गृहिणींना थकवा जाणवेल. कला-क्रीडा क्षेत्रातील मंडळींचा संघर्ष चालूच राहील.

वृश्चिक – (शुभ रंग – जांभळा)
आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. आज आई बरोबर मतभेद संभवतात. आज दुरावलेले शेजारी मात्र जवळ येतील.

 

धनु – (शुभ रंग – मोरपिसी)
आज योग्य माणसे तुमच्या संपर्कात येतील. ठामपणे घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. हाती पैसा खेळता राहील. जवळपासच्या प्रवासात खोळंबा होऊ शकतो.

मकर – (शुभ रंग – मरून)
आज हाती पैसा राहील, आवडत्या क्षेत्रात तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आज स्वतःचे लाड पुरवाल. उंची वस्त्र खरेदी कराल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर सापडेल.

 

कुंभ – (शुभ रंग – नारिंगी)
आज आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. रिकामटेकड्या चर्चेतून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. एखाद्या समारंभात वावरताना आपले मौल्यवान ऐवज सांभाळा.

मीन – (शुभ रंग – डाळिंबी)
कार्यक्षेत्रात अनुकुलता वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. आज तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. दुपारनंतर एखादा लाभ संभवतो. आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: