राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज ​- आजचे पंचांग. वार – बुधवार. 7 एप्रिल 2021

शुभाशुभ विचार — उत्तम दिवस.
आज विशेष – पापमोचनी एकादशी.
राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र – धनिष्ठा.
नक्षत्र पाया– तांबे.
चंद्र राशी – 15.00पर्यंत मकर. नंतर कुंभ.

आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग- जांभळा)

संमिश्र फळे देणारा असा आजचा दिवस आहे. विरोधकांचा विरोध तुमचा उत्साह वाढवणाराच ठरेल. योग्य वेळी अधिकारांचा वापर करावाच लागेल. कोणत्याही नवीन उपक्रमाची सुरुवात आज जरूर करा.

वृषभ – ( शुभ रंग- निळा)

नवीन उपक्रम हाती घेतले असतील तर त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यशाची खात्री 100% आहे. विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षा वाढतील.

मिथुन – ( शुभ रंग – हिरवा)

आज नोकरदारांनी फक्त आपल्या वाट्याचे काम करून घर गाठावे. जास्त खोलात शिरलात तर अडचणी वाढतील. झटपट लाभाचा मोह टाळणे हिताचे. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत रहावे.

कर्क – ( शुभ रंग -मोतिया)

महत्त्वाच्या चर्चेत आधी ऐकून घ्या. आपले मत मांडण्याची आज घाई करू नका. मोठे आर्थिक व्यवहार आज टाळलेत तर बर होईल. जोडीदारचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. आज कोणतीच रिस्क नको.

सिंह – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी यासाठी तुमचा हट्ट राहील. त्यामुळे सहकारी वर्गाची नाराजी ओढवून घ्याल. आज सुसंवाद गरजेचा आहे. पत्नीचे सल्ले डावलू नका.

 

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी)

नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाची तुमच्यावर मर्जी राहील. सहकार्‍यांशीही सलोखा राहील. आज संध्याकाळी कदाचित डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल.

तूळ – (शुभ रंग – मोरपंखी)

आज कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे थोडेसे अवघड जाईल.

वृश्चिक – ( शुभ रंग- अबोली)

आज दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. गृहिणींचे गृह उद्योग तेजीत चालतील. कलाकारांना मात्र कामासाठी भटकंती करावी लागेल. भाडेकरूंचे घर मालकांशी वाद संभवतात.

धनु –( शुभ रंग- केशरी)

आज काही अति आवश्यक खर्च हात जोडून उभे राहतील. घर दुरुस्तीच्या किरकोळ कामात लक्ष घालावे लागेल. बेरोजगारांना नोकरीसाठी कॉल येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.

मकर – ( शुभ रंग – क्रीम)

आज काही दुरावलेल्या हित संबंधात संबंधात सुधारणा होईल. काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे. आवक चांगली असली तरी बचातीस महत्त्व देणे गरजेचे आहे.

कुंभ – ( शुभ रंग – लाल)

सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वी उरककेली बरी. आज स्वावलंबन हेच हिताचे राहील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची मते विचारात घेणे आज गरजेचे राहील. कायद्यात राहिलेले तब्येतीस चांगले राहील.

मीन – ( शुभ रंग सोनेरी)

आज तुम्ही आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. एखादी सुरक्षित गुंतवणूक कराल. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

ग्लोबल न्युज नेटवर्क: