राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज ​- आजचे पंचांग वार – गुरुवार, 10 जून 2021

शुभाशुभ विचार वर्ज्य दिवस.
आज विशेष-भवुका आमावस्या.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – मृग 14.31 पर्यंत नंतर आर्द्रा.
चंद्र राशी – मिथुन.

आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग- तांबडा)

आज घरा बाहेर वावरताना रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. काम कमी व दगदगच जास्त होणार आहे. आज वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शकतो.

वृषभ – ( शुभ रंग – मोतिया)

आज पैशाची कमतरता भासणार नाही. कार्यक्षेत्रात मान-सन्मान वाढेल. भावंडांमध्ये मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.

मिथुन – ( शुभ रंग – क्रीम)

योग्य माणसे संपर्कात येतील. मीपणा सोडून व गोड बोलून स्वार्थ साधून घेणे गरजेचे. कुणालाही सल्ले देण्याच्या भानगडीत न पडता फक्त आपलं कसं चाललय तेवढेच बघा.

कर्क – ( शुभ रंग- पांढरा)

काही कारण नसताना आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंच्या कमी याल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहणार आहे. आज गरजेपुरतेच बोला.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कष्टांचे चीज होईल. विरोधक नमते घेतील.

 

कन्या – (शुभ रंग- हिरवा)

अधिकारांचा वापर जपून करा. अति स्पष्ट बोलण्याने तुमच्याच काही हितचिंतकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घ्या.

तूळ – (शुभ रंग- जांभळा)

व्यवसायात जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. अविश्रांत मेहनती नंतरच यशाची चाहूल लागेल. नवीन व्यावसायिकांनी आपली कुवत ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात.

वृश्चिक – ( शुभ रंग- आकाशी )

आज चुकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका. विश्वासातील व्यक्तीकडूनही विश्वास घात होऊ शकतो सतर्क राहा.

धनु – (शुभ रंग- चंदेरी)

व्यवसायात भागीदरांशी विश्वास दृढ होईल. वैवाहिक जीवनात तुम्हाला जुन्या फोटोंचा अल्बम चाळावसा वाटेल. इतरांच्या भांडणात आज यशस्वी मध्यस्थी कराल.

मकर – ( शुभ रंग- निळा)

नोकरदार मंडळी आज वरिष्ठांच्या आज्ञा झेलतील. ज्येष्ठ मंडळींना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत. व्यवसायात जुनी उधारी वसूल होईल.

कुंभ – ( शुभ रंग- भगवा )

तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृतीस्वास्थ्य लाभेल. तरुणाई आज जीवाची मुंबई करतील. प्रेम प्रकरणांना आज ग्रीन सिग्नल.

मीन – ( शुभ रंग- गुलाबी)

आज तुमचे मनोबल उत्तम असेल आवक पुरेशी राहील. तरीही बचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे गृहिणींना माहेरची ओढ लागेल. प्रेमप्रकरणे आज बोअर करतील.
!! शुभं भवतु!!

– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागारToday’s Horoscope 10 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ

2020 horoscop2020 horoscopeaaj ka rashi aaj ka rashiaaj ka rashifalastrologerHoroscopejayant kulkarnijayant kulkarni astrologerjyotish jayant kulkarnirashifal horoscopetoday rashifaltoday’stoday’s horoscopetodays horoscope in marathiजाणून घ्या आजचे राशीफळजाणून घ्या कसा जाईल आपला आजचा दिवस
0
Share

PREV POST
Pune News : ‘ड्रेनेजचे 392 कोटींचे काम विशिष्ट ठेकेदारालाच देण्याचा घाट’
Leave a comment

HOROSCOPE
Today’s Horoscope 10 June 2021 : जाणून घ्या आजचे राशीफळ
By Sudesh On जून 10, 2021
0
Share
एमपीसी​ न्यूज ​- आजचे पंचांग वार – गुरुवार, 10 जून 2021

शुभाशुभ विचार वर्ज्य दिवस.
आज विशेष-भवुका आमावस्या.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – रोहिणी 11.44 पर्यंत नंतर मृग.
चंद्र राशी – वृषभ 25.10 पर्यंत नंतर मिथुन.

 

आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. खर्च वाढत असला तरीही पैसा कमी पडणार नाही. आज भावंडांमध्ये क्षुल्लक कारणाने कटुता येऊ शकते. शब्द जपून वापरा.

वृषभ – ( शुभ रंग- मरून)

आज तुमसे मनोबल उत्तम राहील तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. योग्य माणसे संपर्कात येणार आहेत. आप्तस्वकीयात तुमच्या शब्दाचा मान राहील.

मिथुन – ( शुभ रंग- आकाशी)

आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकुन घेतलेली बरी. थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्त्वाची मेल्स येणार आहेत. काहींना दूरचे प्रवास घडतील.

कर्क – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज काही मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. संध्याकाळी काही जुन्या मित्रांच्या सहवासात वेळेचे भान राहणार नाही.

सिंह – ( शुभ रंग- मोरपंखी)

उद्योगधंद्यात स्पर्धा वाढलेली असेल. जाहिरातबाजी वाढवावी लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या बातम्या ये

ग्लोबल न्युज नेटवर्क: