आजचे राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी

आजचे पंचांग – वार शुक्रवार, दि. 14-01-2022

 

शुभाशुभ विचार- आनंदी दिवस.

आज विशेष- मकर संक्रांती.

राहू काळ – सकाळी 10.30 ते 12.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र- रोहिणी 20.18 पर्यंत नंतर मृग.

चंद्र राशी –  वृषभ.

_______________________

आजचे राशीभविष्य

मेष -( शुभ रंग- पांढरा)

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळू शकेल. वक्ते व्यासपीठ गाजवतील. विरोधक नमते घेतील.

वृषभ- ( शुभ रंग- आकाशी)

आज तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणे हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा, मोफत सल्ले वाटप नको.

मिथुन-( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमची मोठ्या लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. जमाखर्चाचा मेळ घालणे जरा अवघड जाईल.

कर्क – (शुभ रंग- पिस्ता)

व्यवसायात आर्थिक उलाढाल वाढेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने स्वीकाराल. स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील.

 

सिंह – ( शुभारंभ- डाळिंबी)

वादविवादात आज तुम्ही स्वतःचेच घोडे पुढे दामटवाल. हाताखालच्या मंडळींना तुमचे दडपण जाणवेल. आज आर्थिक व्यवहारात मात्र सावध राहणे गरजेचे आहे.

कन्या- (शुभ रंग- सोनेरी)

क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेमुळे थोडेफार नैराश्य जाणवेल. विद्यार्थी आज अभ्यासात चालढकल करणार आहेत.

तूळ (शुभ रंग – चंदेरी)

आज तुम्ही जे काही कराल ते तब्येतीला जपूनच करा  विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच. अंगमेहनतीची कामं करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेस प्रथम प्राधान्य द्यावे

वृश्चिक – (शुभ रंग -केशरी)

आज तुम्ही व्यवसायातील वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची साथ मोलाची राहील. पारिवारिक सदस्यांमध्ये सलोखा राहील.

 

धनु – (शुभ रंग- सोनेरी)

ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. अहो सर सलामत तो पगडी पचास हे लक्षात ठेवा. काही येणी असतील तर न मागता वसूल होतील.

मकर- (शुभ – रंभ क्रीम)

घरात आधुनिक सुखसोयी साठी खर्च कराल. कार्यक्षेत्रात तुम्हाला पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. कलाकारांची लोकप्रियता वाढेल. आनंदी दिवस.

 

कुंभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस.

मीन – ( शुभ रंग- मरून)

दैनंदिन कामात काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून आज सर्व काही सुचेल. आज काही देणी चुकवावी लागणार आहेत. शेजाऱ्यांशी आज गोडी गुलाबी राहील.

 

MPC न्यूज च्या सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी.

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: