राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज ​- आजचे पंचांग. वार – सोमवार. 26 एप्रिल 2021

शुभाशुभ विचार — 13 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष –सर्व देवांना दवणा वाहणे.
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – चित्रा.
चंद्र राशी – कन्या 12.32 पर्यंत नंतर तुळ.

 

आजचे राशीभविष्य

 

मेष – ( शुभ रंग – क्रीम)

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी इतरांच्या भानगडीत न डोकावता कामाशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे. तरुणांनी व्यसने टाळावीत.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदासाठी वेळ देतील. नवोदित कलाकारांना ग्लॅमर ची चव चाखता येईल. चैनीसाठी पैसा उपलब्ध होईल.

मिथुन – (शुभ रंग- डाळिंबी)

सर्व दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागेचे प्रश्न सुटतील. काही भाग्यवान महिला आज उंची रत्न खरेदी करतील. ब्युटी पार्लर तेजीत चालतील.

कर्क – (शुभ रंग- पिस्ता)

आजचा दिवस धावपळीत जाणार आहे. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींना तातडीच्या कामासाठी प्रवासाला निघावे लागेल. मुलांच्या पुस्तकात डोकवावे लागेल.

 

सिंह – ( शुभ रंग- पांढरा)

कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. घरात आज पाहुण्यांची वर्दळ राहील. गृहिणींना उसंत मिळणे कठीण. शेजाऱ्यांशी अबोला असेल तर आज गैरसमज दूर होतील.

कन्या – ( शुभ रंग – जांभळा )

अति सडेतोड बोलण्यामुळे काही हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. नाती सांभाळायची असतील तर डोके थंड आणि वाणीत गोडवा असू द्या. एखाद्याची स्तुती करण्यात कंजूसपणा नको.

तूळ – ( शुभ रंग- मरून )

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होईल. काही हरवले असल्यास दुपारनंतर गवसेल. घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकतील.

वृश्चिक – (शुभ रंग- नारिंगी)

सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावाल. जिवलग मित्रांकडून तुम्हाला अपेक्षित सहकार्य मिळेल. सकाळी भरलेले खिसे दुपारनंतर मात्र रिकामे होण्याची शक्यता आहे.

धनु – (शुभ रंग – केशरी )

नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. काही कर्ज प्रस्ताव केले असतील तर ते मंजूर होऊ शकतील. विरोधक आता दमले आहेत, त्याची काळजी नको.

मकर – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

वडीलधारी मंडळी त्यांचे विचार तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. वाद न घालता फक्त हो म्हणा आणि सोडून द्या. त्यांच्या वयाचा मान राखणे गरजेचे आहे.

कुंभ – (शुभ रंग – गुलाबी)

सम व्यवसायिक स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. मोठ्या आर्थिक उलाढाली आज टाळा. कोणतेही गैरवर्तन नको. आज आपल्या प्रतिष्ठेस जपा.

मीन – ( शुभ रंग- निळा)

आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. दुपारनंतर काही वाद संभवतात, पण त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल.
!! शुभं भवतु!!
– जयंत कुलकर्णी
फोन – 96891 65424
(ज्योतिष व वास्तु सल्लागार

ग्लोबल न्युज नेटवर्क: