राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग : वार – रविवार, दि. 07.11.2021

शुभाशुभ विचार – अनिष्ट दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – ज्येष्ठा 21.04 पर्यंत नंतर मूळ.
चंद्र राशी – वृश्चिक 21.04 पर्यंत नंतर धनु.
—————————————


आजचे राशीभविष्य –

मेष – (शुभ रंग – निळा)

अनोळखी व्यक्तींवर चुकूनही विश्वास ठेवू नका. आज उधारी उसनवारी आवर्जून टाळा. धाडसाची कामे आज नकोत. सत्संगाकडे पावले आपोआप वळतील. वैवाहिक जीवनात मौन स्वीकारा.

वृषभ – ( शुभ रंग – पिस्ता)

व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. नोकरदारांनी आज नोकरीच्या ठिकाणी झटपट लाभाचा मोह टाळा. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आज छान दिवस.

मिथुन – (शुभ रंग – हिरवा)

संमिश्र फळे देणारा आजचा दिवस असून काम कमी व दगदग, धावपळच जास्त होईल. गृहिणींना वाढत्या जबाबदाऱ्यांचा थकवा येईल. आशादायी दिवस.

कर्क – ( शुभ रंग – गुलाबी)

काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी होईल. दुकानदारांची थकलेली उधारी वसूल होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे.

 

सिंह – ( शुभ रंग – लाल)

काही जुनी रेंगाळलेली विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. महिला आज मौल्यवान खरेदी करतील. चालू नोकरीत बदल करायचा असेल तर संधी चालून येतील. आईचे मन जपा.

कन्या – ( शुभ रंग – मोतिया )

प्रॉपर्टी विषयी काही व्यवहार उद्यावर ढकला. अडचणीच्या प्रसंगी आज शेजारी मदतीस धावून येतील. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

 

तुळ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. नव्या ओळखी होतील. अधिकारी वर्गाने कागदपत्रांवर सह्या करताना सतर्क राहावे.

वृश्चिक – ( शुभ रंग – आकाशी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असेल. गृहिणींना आज अचानक आलेल्या पाहुण्यांची ऊठबस करावी लागेल. प्रवासात दगदग होईल शक्यतो टाळा.

धनु – (शुभ रंग – भगवा )

अति स्पष्टवक्तेपणामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवला तर अनेक क्‍लिष्ट कामे सोपी होतील. विरोधकही आज नमते घेतील.

मकर – (शुभ रंग – जांभळा)

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. महत्त्वाच्या कामानिमित्त आज बरीच पायपीट होणार आहे. पासपोर्ट, विजा विषयक कामे यशस्वी होतील.

कुंभ – ( शुभ रंग – नारिंगी )

सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून आज अपेक्षित सहकार्य मिळेल. विवाहविषयक बोलणी सकारात्मकतेने पार पडतील.

मीन – ( शुभ रंग – मरून)

यशस्वी लोकांच्या सहवासात तुमच्या ही महत्वाकांक्षा वाढतील. घरगुती गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होईल. आज जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन- 9689165424
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: