राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – 31 ऑक्टोबर 2021 वार – रविवार.

शुभाशुभ विचार – 14 नंतर चांगला दिवस.

आज विशेष – साधारण दिवस.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – मघा 13.16 पर्यंत नंतर पूर्वाफाल्गुनी

चंद्र राशी – सिंह.

————————————–

आजचे राशीभविष्य –

मेष – (शुभ रंग – मोतिया)

नोकरीच्या ठिकाणी आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. मोबदला कमी असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. आज तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त दिवस.

वृषभ -( शुभ रंग- सोनेरी )

आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

मिथुन- ( शुभरंग – केशरी )

ऑफिस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे. वाद-विवाद संभवतात. गृहिणींनी आज सासुबाई कडून शाबासकीची अपेक्षा अजिबात ठेवू नये.

कर्क – ( शुभ रंग- हिरवा )

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थिती ही चांगली असेल. परंतु भावनेच्या भरात कोणालाही कसलीही वचने देऊ नका.

सिंह – ( शुभ रंग – मरून )

आज तुमचा आत्मविश्‍वास वाढवणार्‍या काही घटना घडतील. एखादा जोडधंदा असेल तर त्यातून चांगली आवक होईल. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र चोख ठेवावेत.

कन्या -( शुभ रंग- डाळिंबी )

आज काही दुरचे नातलग संपर्कात येणार आहेत. इम्पोर्ट एक्सपोर्ट चे व्यवसाय तेजीत चालणार आहेत. आज काही देणी द्यावी लागतील. विवाह विषयक चर्चा आज नकोत.

तुळ – ( शुभ रंग – चंदेरी )

जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ पदरात पडेल. काही दुरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाहयोग जुळून येतील. मित्रच आज तुम्हाला हिताचे सल्ले देतील.

वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी )

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीत प्रमोशन ची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या तुमच्या बद्दलच्या अपेक्षा वाढतील. घरगुती कामे दुर्लक्षित होतील.

धनु – (शुभ रंग- जांभळा )

हितशत्रू सक्रीय आहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज परिश्रमाने यश सोपे होईल दैवाची साथ तर आहेच. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका.

मकर – ( शुभ रंग- गुलाबी )

विरोधक सक्रिय असताना बिनचूक कामास प्राधान्य द्यावे लागेल. कोणाकडून कसली अपेक्षा करू नका म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. आज धाडसाची कामे टाळा.

कुंभ- (शुभ रंग- मोरपिशी)

घराबाहेर आज तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. एखाद्या मंगल कार्यात जोडीने उपस्थित रहाल. प्रवासात मात्र खोळंबा होण्याची शक्यता आहे.

मीन – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

अती श्रमाचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आरोग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करू नका. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. पोट बिघडणार आहे.

!! शुभम भवतु!!

– जयंत कुलकर्णी

फोन 9689165424

( ज्योतिषी आणि वस्तू सल्लागार )

ग्लोबल न्युज नेटवर्क: