राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – शुक्रवार, दि. 29.10.2021

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष — सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी १०.३० ते १२.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र -पुष्य ११.३८ पर्यंत नंतर आश्लेषा
चंद्र राशी – कर्क.
______________________


आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग- राखाडी)

कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. गृहिणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवावी. कलाकारांना कामासाठी स्ट्रगल वाढवावी लागेल.

वृषभ – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

आज भावंडांमध्ये सामंजस्य राहील. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. दुपारनंतर तातडीने प्रवासास निघाल.

मिथुन – (शुभरंग- तांबडा)

तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठितांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. प्रभावी वक्तृत्वाने समोरच्या व्यक्तीस प्रभावित कराल.

कर्क – ( शुभ रंग – क्रीम)

महत्त्वाचे व्यावसायिक करार आज दुपारनंतर करावेत. काही हरवले असल्यास पुन्हा शोधा म्हणजे सापडेल. आज कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल.

सिंह – ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्त्वपूर्ण निर्णय जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्यावेत. परदेशाशी संबंधीत कामे यशस्वी होतील.

कन्या – ( शुभ रंग- सोनेरी)

कार्यक्षेत्रात तुम्ही पूर्वी केलेल्या श्रमांचे चीज होईल. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. क्षुल्लक कारणाने दुखावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

तुळ – ( शुभ रंग- पांढरा)

विरोधकांचा विरोध कमी होईल. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल. एखाद्या जिवलग मित्राच्या मदतीस धावून जाल. इतरांच्या भल्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर कराल.

वृश्चिक – (शुभ रंग- आकाशी)

आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी उद्भवतील. काही मानसिक संतुलन बिघडवणारे प्रसंग घडतील. संध्याकाळी सत्संगाकडे पावले वळतील. आजी-आजोबांना नातवंडांचा लळा लागेल.

धनु – (शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्ही कुणाचेही ऐकून घेण्याच्या तयारीत नसाल. काही क्षुल्लक गोष्टींनी मानसिक स्वास्थ्य बिघडेल. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळल्यात तर बरे होईल.

मकर – ( शुभ रंग- लाल)

कुटुंबातील काही आनंदी घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. प्रेम प्रकरणांना घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. आज दिवाळीच्या खरेदीचा शुभारंभ कराल.

कुंभ- (शुभ रंग- पिस्ता)

उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. आज काही गोड बोली माणसे भेटतील परंतु गाफील राहू नका. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश.

मीन – ( शुभ रंग- मोरपंखी)

काही दुरावलेल्या हितसंबंधात सुधारणा होईल. उद्योग-धंद्यात उत्साही वातावरण राहील. नोकरदारांना मात्र नोकरीत बदल करावासा वाटेल. आज मुले आज्ञाधारकपणे वागतील.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन – ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: