राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – शनिवार, दि. 09.10.2021

शुभाशुभ विचार – क्षयदिन.
आज विशेष – विनायक चतुर्थी.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – विशाखा 16.47 पर्यंत नंतर अनुराधा.
चंद्र राशी – तुळ 11.20 पर्यंत नंतर वृश्चिक.
—————————————

आजचे राशीभविष्य.

मेष ( शुभ रंग मोरपिशी)

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकायला हवीत. कामात चुका करून विरोधकांना आयती संधी देऊ नका. आज तुम्हाला काही काळ एकांताची गरज भासेल.

वृषभ – ( शुभ रंग जांभळा )

इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करण्याची तुमची तयारी असेल. आज संध्याकाळी लवकर घर गाठा. जोडीदारचे मन सांभाळण्याचा प्रयत्न करणे हिताचे राहील.

मिथुन- ( शुभरंग- मरून )

नोकरदारांना ओव्हर टाइम करावा लागेल. ज्येष्ठांना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका.

कर्क- ( शुभ रंग- मोतिया )

आर्थिक अडचणींवर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पळता येतील रसिक मंडळी जीवाची मुंबई करतील. प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील.

सिंह – (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

तुमच्या खर्चिक स्वभावामुळे आज पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. घराबाहेर वावरतांना डोके शांत ठेवा वाद टाळा. मुलांचे लाड करताना त्यांच्या शिस्तीस ही प्राधान्य द्या.

 

कन्या – ( शुभ रंग – डाळिंबी)

कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्या बऱ्या. प्रॉपर्टी विषयक आर्थिक व्यवहार आज नकोत. महत्त्वाचे दस्तऐवज सांभाळा.

तूळ- ( शुभ रंग- केशरी )

नोकरी-धंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. आज श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. वाणीत मृदुता हिताची राहील.

 

वृश्चिक – ( शुभ रंग- निळा )

दैनंदिन कामे वेळच्यावेळी पार पडतील. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. मुले आज्ञेत वागतील. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य द्या.

धनु – ( शुभ रंग- पिस्ता)

कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. जमा खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. गृहिणींना विविध जाहिराती भुरळ घालतील. पायपीट होईल.

 

मकर- ( शुभ रंग- आकाशी )

आज किचकट कामेही विनासायास पार पडतील. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. इच्छापूर्ती चा दिवस असल्याने आपले विचारही सकारात्मक ठेवा.

कुंभ- ( शुभ रंग- हिरवा )

काही मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. कार्यक्षेत्रात काही बिकट प्रसंगांना सहज तोंड द्याल. आपल्या पिताश्रींनी दिलेले सल्ले विचारात घ्या.

 

मीन – ( शुभ रंग- पांढरा)

ज्येष्ठ मंडळींनी हाती असलेली पुंजी जपुन वापरावी. महत्त्वाच्या कामास विलंब होईल. तरुणांनी कुसंगत टाळावी. नीती बाह्य वर्तन अंगाशी येईल सावध रहा.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: