ग्लोबल न्यूज: आजचे पंचांग – वार – शुक्रवार, दि. 01.10.2021
शुभाशुभ विचार- 11 प. चांगला दिवस.
आज विशेष- दशमी श्राद्ध.
राहू काळ – दुपारी 10.30 ते 12.00.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आजचे नक्षत्र – पुष्य.
नक्षत्र पाया- चांदी.
चंद्र राशी – कर्क.
_______________________
आजचे राशीभविष्य
मेष – (शुभ रंग- पिस्ता)
तुमच्या कार्यक्षेत्रात तुमच्या प्रगतीचा आलेख चढता राहील. पारिवारिक सुखात वृद्धि होईल. आज वाहन वास्तूविषयी खरेदी विक्री फायदाच राहील.
वृषभ – (शुभ रंग – मरून)
आज तुम्हाला कौटुंबिक कर्तव्य पार पाडण्यासाठी वेळ काढावाच लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. एखाद्या अडचणीच्या वेळी शेजारीच मदतीला धावून येतील.
मिथुन (शुभ रंग – राखाडी)
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यापारी अधिक गुंतवणुकीस प्राधान्य देतील. शेजारी काही क्षुल्लक कारणास्तव नाराज असतील.
कर्क- ( शुभ रंग- पांढरा)
आज तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन संभवते. अतिशय स्पष्ट बोलून काही जवळची नाती दुखावू नका.
सिंह – (शुभ रंग – हिरवा )
भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेतेमंडळींची समाजात लोकप्रियता वाढेल. घरात काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे येतील. खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर जाणार आहे.
कन्या – ( शुभ रंग- भगवा)
आज आपला मोठेपणा दाखवण्यासाठी अनावश्यक खर्च करावा लागणार आहे. दुरावलेल्या नात्यातील गैरसमज दूर होतील. आज दुपारनंतर एखाद्या लाभ होण्याची शक्यता आहे. खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील.
तुळ – ( शुभ रंग- नारिंगी)
नोकरीत तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरिष्ठांना प्रभावित करेल. बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. व्यवसायात सहज घेतलेले निर्णय योग्यच ठरतील. प्रयत्नांना नशिबाची साथ मिळेल.
वृश्चिक – (शुभ रंग – केशरी)
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भावना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे आज कठीण जाईल. जितके कमी बोलाल तितके चांगले राहील.
धनु – ( शुभ रंग – मोरपंखी)
वैवाहिक जीवनात आज संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. परंतु त्यातून सामंजस्याने मार्ग निघेल. आज कुठेही मोठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा.
मकर – ( शुभ रंग- आकाशी)
व्यावसायिक चढ उतारांचा सामना करावा लागेल, काही मनाविरुद्ध घटना आज मनास बेचैन करतील. आज थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. व्यर्थ वाद टाळा.
कुंभ – ( शुभरंग- स्ट्रॉबेरी)
आज तुम्ही स्वतःचे लाड पुरवण्यासाठी खर्च कराल. तरुणांना घरातील थोरांचे विचार पटणार नाहीत. नोकरदारांना कामावर दांडी मारून घरी आराम करायचा मूड असेल.
मीन – ( शुभ रंग- गुलाबी)
आजच स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमध्ये काही वैचारिक मतभेद संभवतात सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्या.
!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)