राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – वार बुधवार  (Today’s Horoscope 20 July 2022) 

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस

आज विशेष — कालाष्टमी 

राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30

दिशा शूल – उत्तरेस असेल

आजचे नक्षत्र – रेवती 12.51 पर्यंत नंतर अश्विनी

चंद्र राशी – मीन 12.51 पर्यंत नंतर मेष

________________________

आजचे राशीभविष्य-

मेष – ( शुभ रंग – पिस्ता )

आज आपल्या जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास प्राधान्य द्याल. वादविवादात आज आपल्याच मतावर पडून रहाल. आज दुपारनंतर एखादी महत्त्वाची बातमी येण्याची शक्यता आहे.

वृषभ – (शुभ रंग- जांभळा)

काम धंद्यात काही अनपेक्षित अडचणी येण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधारी मंडळी आज आपलेच खरे करतील. दिवसाच्या उत्तरार्धात मोठ्या आर्थिक उलाढाली नकोत. पैसा जपून वापरा.

मिथुन – (शुभ रंग- मोरपिशी)

आज पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे. जीवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आज वैवाहिक जीवनात खेळीमेळीचे वातावरण राहील.

कर्क – (शुभ रंग -डाळिबी)

आपल्या सडेतोड बोलण्याच्या वृत्तीमुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. घराबाहेर वावरतांना डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक  कामे सोपी होतील.

सिंह – (शुभ रंग- सोनेरी)

कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. थोडा संयम ठेवा. गृहिणींना अति श्रमामुळे थकवा जाणवेल. भक्तीमार्गात असणार्‍यांना एखादी प्रचिती येईल.

कन्या – ( शुभ रंग- चंदेरी)

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही मानापमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते. महत्वाच्या चर्चा बैठकी आज टाळलेल्या बऱ्या.

तूळ – (शुभ रंग- गुलाबी)

आजचा दिवस धावपळीत जाईल एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. दूरच्या प्रवासात थोडा खोळंबा होईल.

मामा मावशी यांच्याकडून काही सुवार्ता येतील.

वृश्चिक – ( शुभ रंग- राखाडी)

दैनंदिन कामे आज सुरळीत पार पडतील. गरजेइतका पैसाही उपलब्ध होईल. प्रेम प्रकरणे मात्र डोक्याला मनस्ताप देतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका काढू नका.

धनु – ( शुभ रंग- क्रीम)

कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहिणी आपल्या आवडत्या छंदास आवर्जून वेळ देतील. रुग्ण ठणठणीत बरे होतील. उच्चशिक्षितांच्या महत्वाकांक्षा वाढतील.

मकर – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

वास्तु किंवा वाहन खरेदीसाठी कर्ज मंजूर होईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुमध्ये एखादे धार्मिक करण्याचे बेत आखाल.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

कार्यक्षेत्रात हितशत्रूंच्या उपद्रव वाढणार आहे. बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे कुसंगत टाळावी

मीन – ( शुभ रंग- मरून)

आज सर्व दृष्टीने अनुकूल असा दिवस असून दैनंदिन कामे विना व्यत्यय पार पडतील. नव्या ओळखीतून व्यवसायवृद्धी होईल.

संध्याकाळी सहकुटुंब चैन कराल.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

ग्लोबल न्युज नेटवर्क: