राशिभविष्य ; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

आजचे पंचांग – Today’s Horoscope 15 October 2022
शनिवार.
तारीख 15.10.2022
शुभाशुभ विचार- सामान्य दिवस दिवस.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.
दिशा शूल- पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र- मृग 23.22 पर्यंत नंतर आर्द्रा.
आजची चांद्रारशी – वृषभ 10.01 पर्यंत नंतर मिथुन.

मेष: आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील.

वृषभ: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल.

मिथुन:  आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. कुटुंबीय व संततीशी मतभेद संभवतात. आवेश व संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत.

कर्क:  आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल.

सिंह: आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल.

कन्या: आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात चिंता राहील. शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा व अशक्तपणामुळे कामे धीम्या गतीने होतील.

तूळ: चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज शक्यतो वाद टाळणे हितावह राहील. रागावू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवणे हितावह ठरेल. हितशत्रूं पासून सावध राहावे.  

वृश्चिक: चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल.

धनु: चंद्र वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल.  

मकर: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. शारीरिकदृष्टया आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही.

कुंभ: आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन: आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. आपली सृजनशक्ती वाढेल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: