गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नाही’ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे विधान

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. या आरोपानंतर विरोधकांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

राज्यात घडलेल्या या सर्व राजकीय घडामोडीनंतर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले होते. तसेच राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांची बैठक दिल्ली येथे पार पडली होती. या बैठकींनंतर जयंत पाटील यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधला होता.

दरम्यान, पत्रकारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला असता, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांच्या पाठीशी उभी असल्याचं पाहायला मिळत आहे.

Team Global News Marathi: