“हिसाब तो देना पडेगा” राऊतांच्या ट्विटनंतर किरीट सोमय्या यांचे ट्विट

 

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून खासदार संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जमिन घोटाळाप्रकरणी ईडीने नोटीस बजावण्यात आली होती. तर आता चौकशीसाठी त्यांना मंगळवारी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून शांत असलेले भाजपा नेते किरीट सोमय्या पुन्हा अॅक्टीव झाले आहेत.

ईडीकडून राऊतांना समन्स मिळताच, हिसाब तो देना पडेगा असे म्हणत सोमय्या आणि राऊत यांच्यातील शाब्दिक युद्धाला पुन्हा सुरवात होणार असल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे गटाकडून सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आता भाजपा नेते समोर येऊ लागले आहेत. मात्र, किरीट सोमय्या यांनी सध्याच्या राजकीय उलथापालथीवर प्रतिक्रिया न देता संजय राऊतांनाच टार्गेट केले आहे. राज्याचे राजकारण ढवळून निघत असतानाच पुन्हा ट्विट युध्द पाहवयास मिळणार हे नक्की आहे.

सध्याच्या राजकीय परस्थितीवर एक चकार शब्द न काढता सोमय्या यांनी थेट ‘हिसाब तो देना पडेगा’ म्हणत केलेल्या घोटाळ्या प्रकरणी कारवाईला तर सामोरे जावेच लागणार असल्याचे म्हणले आहे. एवढेच नाहीतर तुम्ही मला, पत्नीला, मुलगा नीलला आणि आईला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. आम्हाला धमक्या द्या, हल्ले करा, शिव्या द्या पण आता ‘हिसाब तो देना पडेगा ‘ अशा आशयाचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

Team Global News Marathi: