हिंदुत्वाच्या मुद्यावर कुणाला घाबरावयाचे नाही, मात्र..,

 

हिंदुत्व या मुद्द्यावरून आम्हाला कोणाला घाबरवायचे नाही. ज्यांना भीती वाटते त्या अल्पसंख्याक लोकांसोबत आम्ही संवाद साधत असतो, हे अनेक दिवसांपासून सुरू आहे’ असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितलं. तसंच, ‘परिस्थितीनुसार राष्ट्र विरोधी लोक वागतात, हे भोळे बनून येतात मात्र आपण त्यांच्यापासून सावधान राहिलं पाहिजे, असा सल्ला भागवत यांनी स्वंयसेवकांना दिला.

विजयादशमीला दरवर्षी साजरा होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिनाला संघ परिवारात अनन्य साधारण महत्त्व आहे. १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दरवर्षी नागपूरच्या रेशीमबाग मैदानात संघ त्यांचा स्थापना दिवस साजरा करतो. हा स्थापना दिवस अत्यंत भव्य पद्धतीने साजरा केला जातो. या कार्यक्रमात दरवर्षी एक प्रमुख अतिथी बोलवले जातात. या वर्षी प्रमुख अतिथी म्हणून एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला संतोष यादव यांना बोलवण्यात आलं. यावेळी मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलं.

आम्ही हिंदुत्वावर कायम आहे. हिंदुत्व या मुद्द्यावरून आम्हाला कोणाला घाबरवायचे नाही. ज्यांना भीती वाटते त्या अल्पसंख्याक लोकांसोबत आम्ही संवाद साधत असतो, हे अनेक दिवसांपासून सुरू आहे’ असं मोहन भागवत यांनी स्पष्टपणे सांगितलं. अलगाववाद हा विचार चुकीचा आहे. आम्ही समाज पंच जात यामध्ये विभागलो असलो तरी समाज म्हणून एक आहोत, असं भागवत यांनी ठणकावून सांगितलं.

Team Global News Marathi: