“बीकेसीत ५ आमदार, २ खासदार शिंदे गटात” उद्धव ठाकरेंना धक्का ?

 

आज पार पडणाऱ्या दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. यातच शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केला आहे. शिंदे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात बीकेसीत शिवसेनेतील ५ आमदार आणि २ खासदार शिंदे गटात प्रवेश करतील, असे कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे.

कृपाल तुमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून मोहन भागवतांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. हिंदूंचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या संघटनेच्या प्रमुखांचे विचार ऐकून पुढे जावे यासाठी येत असतो. याआधी बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुंबईत जायचो. पण आता बीकेसीमध्ये भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येतील, असा विश्वास कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे ५० आमदार आणि १२ खासदार आमच्यासोबत आहेत. आता दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल. शिंदेसोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेला सदैव शिव्या देणाऱ्यासोबत आम्ही गेलेलो नाही, या शब्दांत निशाणा साधत, राज्यात खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची युती झाली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याला गतिमान सरकार मिळाले आहे, असे तुमाने म्हणाले.

Team Global News Marathi: