राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….

राज्यात मान्सून सक्रिय होणार आहे .हवामान विभागाने राज्यातील 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिला आहे. तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे .कोण कोणत्या भागात दिलाय पावसाचा अलर्ट…

राज्यात ऑगस्ट मध्ये रुसलेला मान्सून सप्टेंबर मध्ये सुरू झाला. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली .तीन-चार दिवस पाऊस झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली .त्यानंतर राज्यात 14 सप्टेंबर पासून पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता .आता गुरुवारपासून राज्यातील अनेक भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे .आगामी तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे .या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढणार आहे.

मान्सून सक्रिय होण्यासाठी पूरक वातावरण

पुणे जिल्ह्यासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली गेली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र तयार झाले असून त्याची तीव्रता वाढली आहे. तसेच दक्षिणेकडे सरकलेला मान्सूनचा आस पूरक ठरल्याने राज्यातच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

कोणत्या भागात पावसाचा अलर्ट

पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट दिला आहे .तर उर्वरित विदर्भासह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे .राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट दिला आहे. यामुळे आगामी चार दिवस पावसाचा अलर्ट कायम राहणार आहे .मुंबई पुणे सह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

गोंदिया जिल्ह्यात पाऊस

गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे .गुरुवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली .शुक्रवारी सकाळी सुद्धा पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नदी नाले वाहण्याची शक्यता आहे .भंडारा जिल्ह्यात हवामान विभागाने येल्लो अलर्ट जाहीर केलेला असताना पावसाने हजेरी लावली आहे .गुरुवारी दुपारी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत.

धरणाचे 15 गेट उघडले

गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे .धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे .त्यामुळे धरणाचे पंधरा गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. धरणातून 65 ते 845 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे .त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Team Global: