‘हिमालयन योगी’ घोटाळा: राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना अटक

Himalayan Yogi’ Scandal update : नवी दिल्ली :नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) यांना सीबीआयने (CBI) अटक केली आहे. “हिमालयन योगी” (Himalayan Yogi) म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बाहेरील व्यक्तीसोबत गोपनीय माहिती शेअर करण्यासह शेअर बाजारात गंभीर अनियमितता केल्याचा आरोप चित्रा रामकृष्ण यांच्यावर आहे. दिल्ली न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर आणि गेल्या चार वर्षांत चित्रा रामकृष्णविरुद्धच्या तपासात निष्क्रियता दाखवल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयवर ताशेरे ओढल्यानंतर ही अटक झाली आहे. (Former NSE MD & CEO Chitra Ramakrishna Arrested by CBI in ‘Himalayan Yogi’ Scandal)

दिल्ली न्यायालयाचे ताशेरे आणि कारवाई

विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी असेही निरीक्षण नोंदवले की बाजार नियामक संस्था असलेली सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी (SEBI) आरोपीबाबत “अत्यंत दयाळू” आहे. हे सर्व लक्षात घेऊन की तिच्यावर गंभीर आरोप आहेत आणि सत्य शोधण्यासाठी तिची सतत कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे. गेल्या महिन्यात, चित्रा रामकृष्ण यांच्या निर्णयांवर कथितपणे प्रभाव पाडणारे रहस्यमय “हिमालयन योगी” म्हणजेच आनंद सुब्रमण्यन यांच्यावर संशयाची सूई वळली होती. ते देखील स्टॉक एक्स्चेंजचे माजी अधिकारी असून त्यांना मार्केट मॅनिपुलेशन प्रकरणात अटक करण्यात आली होती.

हिमालयन योगी आणि चित्रा रामकृष्ण

एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी हे “योगी” होते ज्यांनी चित्रा रामकृष्ण यांच्याशी ईमेलद्वारे संवाद साधला होता, अशी माहिती सूत्रांकडून समोर येते आहे.चित्रा रामकृष्ण यांनी तथाकथित योगींच्या प्रभावाखाली घेतलेल्या निर्णयांपैकी एक त्यांची वादग्रस्त नियुक्ती होती, असे सेबीने एका अहवालात म्हटले आहे. सेबीने चित्रा रामकृष्ण आणि इतरांवर श्री सुब्रमण्यन यांची नियुक्ती आणि त्यांच्या मोठ्या पदोन्नतीमध्ये कथित प्रशासकीय त्रुटींचा आरोप केला आहे.

एनएसईची संशयास्पद भूमिका

त्यात म्हटले आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि त्यांच्या बोर्डाला वादग्रस्त सल्लागाराशी झालेल्या संवादाची माहिती होती. परंतु तरीही त्यांनी “हे प्रकरण लपवून ठेवण्याचीच भूमिका घेतली होती. सीबीआय मार्केट एक्स्चेंजच्या कॉम्प्युटर सर्व्हरवरून स्टॉक ब्रोकर्सपर्यंत माहितीच्या कथित अयोग्य प्रसाराची चौकशी करत आहे ज्याला “को-लोकेशन स्कॅम” म्हणून ओळखले जाते.

चित्रा रामकृष्ण आणि एनएसईचेच आणखी  एक माजी मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले रवी नारायण तसेच इतर दोन अधिकार्‍यांना सेबीने वरिष्ठ स्तरावरील भरतीतील त्रुटींबद्दल दंड ठोठावला आहे. रवि नारायण हे एप्रिल 1994 ते मार्च 2013 पर्यंत राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. तर चित्रा रामकृष्णा या एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 पर्यंत एनएसईच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. सार्वजनिक टीकेला उत्तर देताना एनएसईने म्हटले आहे की ते “शासन आणि पारदर्शकतेच्या सर्वोच्च मानकांसाठी वचनबद्ध आहे” आणि हे प्रकरण “जवळजवळ सहा ते नऊ वर्षे जुने असल्याचे म्हटले आहे.


 

ग्लोबल न्युज नेटवर्क: