गुंड गजा मारणे जेलमधून बाहेर, वर्षभरापूर्वी ग्रामीण पोलिसांनी केले होते स्थानबद्ध –

गुंड गजा मारणे जेलमधून बाहेर, वर्षभरापूर्वी ग्रामीण पोलिसांनी केले होते स्थानबद्ध –

ग्लोबल न्यूज : कोथरुड परिसरातील कुख्यात गुंड गजा मारणे अखेर तुरुंगातून बाहेर आलाय. पुणे ग्रामीण पोलिसांनी वर्षभरापूर्वी त्याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करत नागपूर कारागृहात पाठवले होते.  पुणे ग्रामीण पोलिसांनी काही दिवसांपूर्वी गजानन मारणे याच्यावर कारवाई करत आधी त्याला येरवडा कारागृहात ठेवलं होत तर नंतर त्याची रवानगी नागपूर जेलमध्ये करण्यात आली होती. कारवाईची मुदत संपल्याने त्याला मुक्त करण्यात आली असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे.

२०१४ मध्ये पहिल्यांदा झाली होती शिक्षा

२०१४ मध्ये त्याच्यावर खुनाच्या गंभीर आरोपाखाली मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली होती तेव्हापासून तो तुरुंगात होता. या सगळ्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे हा मागच्या वर्षी जेलमधून बाहेर आला होता.

काय होत नेमक प्रकरण

 त्याच्या सुटकेनंतर त्याने आणि त्याच्या साथीदाराने गोंधळ घालत, फटाके फोडत भाली मोठी रॅली काढली होती. याच प्रकरणी गज्या मारणे आणि त्याच्या साथीदारांवर पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली होती. आणि त्याला एक वर्षासाठी एमपीडीए कायद्यांतर्गत नागपूर येथे पाठवण्यात आले होते. आणि आता तब्बल आठ वर्षानंतर गजा मारणे पुन्हा एकदा तुरुंगाच्या बाहेर असणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: