विरारमध्ये हाय प्रोफाइल सेक्सरॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी आवळल्या दोन दलालांच्या मुसक्या
विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी या हाय प्रोफाईल परिसरात राहत असलेल्या घरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. तसेच त्यांना अटक करण्यत आली आहे. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाही केलेली कारवाही केली आहे.
या कारवाईद्वारे तीन मुलींची सुटका करण्यात आली असून एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ग्लोबल सिटी या परिसरात उच्यभ्रू लोकांची वस्ती आहे. या परिसरात मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील लोक भाड्याने घर घेऊन राहतात.
ग्लोबल सिटी परिसरातील एका भाड्याच्या घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती नालासोपारा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सुरुवातीला एक बोगस गिऱ्हाईक पाठवून मिळालेल्या माहितीची आणि तिथल्या परिस्थितीची पूर्ण माहिती गोळा केली असता भाड्याच्या घरात वेश्या व्यवसाय करण्यासाठी ३ मुली आणल्या असल्याचे नजरेस पडले होते
पक्की माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ संबंधित घरावर धाड टाकून ३ मुली, वेश्या व्यवसाय चालवणारा एक पुरुष आणि एक महिला अशा ५ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही मुलींची सुटका केली. आरोपी महिला आणि पुरुषावर PETA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.