हायकोर्टाने खासदार सुजय विखे-पाटील यांना चांगलेच झापले वाचा सविस्तर वृत्त !

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचे खासदार सुजय विखे-पाटील त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आणलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन्स प्रकरणात त्यांच्यावर आता हायकोर्टाने ताशोरे ओढले आहे. खादी चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला असेल तर त्या कृतीमागचा हेतू हा कधीच शुद्ध राहत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांना सुनावले आहे.

सुजय विखे-पाटील यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी विखे-पाटील यांचे वकील म्हणाले की, माझ्या अशिलाची कृती ही कोणत्याही अंगाने गुन्हेगारी प्रकारात मोडत नाही. लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी चार्टर्ड विमानाने परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन्स आणली. मला मान्य आहे की, हे फाजील धाडस होते, पण हा गुन्हा ठरत नाही.

यावर न्यायमूर्ती घुगे यांनी चांगलेच खडेबोल सुनावले. तुमच्या अशिलाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. विमानातून उतरल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन्स उतरवताना व्हीडिओ चित्रित करण्याचा नाटकीपणा त्यांनी करायला नको होता. मतदारसंघांमधील लोकांसाठी मी कशाप्रकारे स्वत:चे वजन वापरून दिल्लीतून इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा त्यांनी टाळायला पाहिजे होता, असे न्यायमूर्ती घुगे यांनी म्हटले.

नगरमधील एका डॉक्टरने पुण्यातील एका कंपनीकडे रेमडेसिव्हिरच्या 1700 कुप्यांसाठी ऑर्डर बुक केली होती. यापैकी 500 कुप्या त्याला मिळाल्या होत्या. उर्वरित १२०० कुप्यांसाठी डॉ. पाटील फाऊंडेशनने त्याला १८,१४,४०० रुपये देऊन तो साठा विकत घेतला. त्यानंतर सुजय विखे-पाटील यांनी संबंधित कंपनीच्या चंदीगढ येथील युनिटवर जाऊन रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा नगरमध्ये आणला असे सांगण्यात येत आहे.

Team Global News Marathi: