हीच आपली संस्कृती आहे का? राज ठाकरेंनी सत्तारांच्या विधानाचा घेतला समाचार

 

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गट अध्यक्षांचा मेळावा आज मुंबईतील नेस्को मैदानात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना राज ठाकरे विविध विषयांवर भाष्य करत यांनी राज्यातील राजकारणाचा स्तर खालावल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आपण आधीपासूनच हिंदुत्ववादी असल्याचा टोला त्यांनी सत्तार यांना लगावला. त्यानंतर त्यांनी सत्तार यांच्यावर सडकून टीकाही केली.

राज्यातील एक मंत्री महिला नेत्याला भिकार.. असे म्हणतो, असे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याची लायकी काय? आपण बोलतोय काय? असे म्हणत राज ठाकरेंनी सत्तारांना फटकारले. महिला नेत्यांना टीव्हीवर शिव्या देता हीच आपली संस्कृती आहे का? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच यायला राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधताना राहुल गांधी यांचा गधड्या असा उल्लेख केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीने रान पेटवले होते. त्यानंतर एका कार्यक्रमादरम्यान सत्तार यांची जीभ घसरली होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टिप्पणी करताना सत्तार यांचा तोल गेला होता. सत्तार यांच्या टिप्पणीनंतर राज्यभर सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीने आंदोलनही केले होते. तसेच, राज्यात जातीवाद वाढत असल्याबद्दल, राजकारणाचा चिखल होत असल्याबाबत राज ठाकरे यांनी आजच्या भाषणात संताप व्यक्त केला. आपण आपल्या पुढच्या पिढीला कोणता आदर्श देणार आहोत? असा प्रश्नही त्यांनी यावेळी सर्वच राजकीय पक्षांना विचारला आहे.

Team Global News Marathi: